AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur tree : नागपुरात दीडशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन, मनपाच्या उद्यान विभागाद्वारे यशस्वी पुनर्रोपन

झाडाचे पुनर्रोपन झाल्यानंतर झाडाला जगविण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी उद्यान विभागाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनशेती विभागप्रमुख व्ही. एम. इल्लोरकर यांच्या सल्ल्यानुसार झाडाची मुळे विकसित करण्यासाठी औषधोपचार करण्यात आला.

Nagpur tree : नागपुरात दीडशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन, मनपाच्या उद्यान विभागाद्वारे यशस्वी पुनर्रोपन
नागपुरात दीडशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन
| Updated on: Jul 27, 2022 | 2:29 PM
Share

नागपूर : मे महिन्यात आलेल्या वादळामुळे दीडशे वर्षांचं जुणे वडाच्या झाड उन्मळून पडले. त्या झाडाला नवजीवन देण्यात मनपाच्या उद्यान विभागाला यश आले आहे. गोरेवाडा तलावाजवळील शासकीय क्वाटर्स परिसरात झाडाचे पुनर्रोपन करण्यात आले आहे. उद्यान विभागाच्या या कामगिरीबद्दल मनपा आयुक्त (Municipal Commissioner) तथा प्रशासक राधाकृष्णन बी. (Radhakrishnan B) यांनी विभागाच्या चमूचे अभिनंदन केले. 24 मे रोजी नागपूर शहरात जोराचे वादळ आले. या वादळामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या (tree) फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या. मात्र यासोबतच मंगळवारी झोनमधील गोरेवाडा तलावाजवळील क्वाटर्स परिसरात असलेले जुने विशाल वडाचे झाड मुळासकट कोलमडून पडले. सुमारे 150 वर्ष जुन्या या झाडाचा घेर 17 फुट एवढा आहे. या झाडाच्या पुनर्रोपनाचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आला. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनात उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार व त्यांच्या चमूने झाडाच्या पुनर्रोपनाचे आव्हान स्वीकारले.

पुनर्रोपनाची प्रक्रिया सुमारे 20 ते 25 दिवस

उद्यान विभागाच्या कर्मचा-यांनी पडलेल्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्या. मुळापासून वर 20 फुटापर्यंत झाडाची उंची ठेवण्यात आली. हे करताना मनपाच्या कारखाना विभागाद्वारे जेसीबीने 25 फुट रुंद आणि 12 फुट खोल मोठा खड्डा खणण्यात आला. झाडाचे यशस्वी पुनर्रोपन करून ते पुढे जगावे यादृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात आली. खणलेल्या खड्ड्याचे झाडाच्या वाढीच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. माती, खत सर्व टाकण्यात आले. झाडाच्या फांद्या कापताना झाडाचा तोल हळुहळू खड्ड्याकडे झुकला जात असल्याने कुठल्याही क्रेनचा आधार न घेता झाडाचे सहजतेने पुनर्रोपन करण्यात उद्यान विभागाला यश आले. झाडाच्या पुनर्रोपनाची प्रक्रिया सुमारे 20 ते 25 दिवस चालल्याचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी सांगितले.

झाडाची मुळे करण्यात आली विकसित

झाडाचे पुनर्रोपन झाल्यानंतर झाडाला जगविण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी उद्यान विभागाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनशेती विभागप्रमुख व्ही. एम. इल्लोरकर यांच्या सल्ल्यानुसार झाडाची मुळे विकसित करण्यासाठी औषधोपचार करण्यात आला. त्यांच्या सल्ल्यानुसार झाडाच्या आजूबाजूला चार पाईप टाकण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या पाईपाद्वारे उन्हाळ्यात झाडाला पाणी दिले जाते. तर इतर तीन पाईपांद्वारे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ‘ग्रोथ हार्मोन्स’चा पुरवठा केला जातो. मे महिन्यातील वादळानंतर पुन्हा ऊन वाढली आणि पुढे जुलै महिन्यात सतत मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र अशाही परिस्थितीत झाड टिकून आहे ही बाब आनंददायी आहे. आज झाडाच्या प्रत्येक फांदीवर नवीन पालवी फुटू लागली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत 150 वर्ष जुने झाड वाचवून त्याला नवजीवन देण्यासाठी मनपाच्या उद्यान आणि इतर विभागाच्या कर्मचा-यांनी समन्वयाने एकत्रितरित्या काम केले. या सर्वांच्या कार्यामुळे झाडाला नवजीवन देता आल्याची भावना उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी व्यक्त केली.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.