AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात 27 मार्चला Aeromodelling Show, 25 ते 30 विमानांचे आकाशातून पथसंचलन होणार

क्रीडा व युवक सेवा विभाग व राष्ट्रीय छात्र सेनाच्या संयुक्त विद्यमाने एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या 25 ते 30 विमानांचे आकाशातून पथ संचलन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

नागपुरात 27 मार्चला Aeromodelling Show, 25 ते 30 विमानांचे आकाशातून पथसंचलन होणार
बैठकीत आढावा घेताना विभागीय आयुक्त प्राजक्त लवंगारे. Image Credit source: tv 9
| Updated on: Mar 18, 2022 | 5:40 AM
Share

नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्च रोजी शहरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या (Divisional Sports Complex at Mankapur) मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे. या एरोमॉडेलिंग शोच्या (Aeromodelling Show) आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्मितीला चालना मिळणार आहे. हा शो सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे. अशा सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या (Divisional Commissioner’s Office) सभागृहात एरोमॉडेलिंग शोच्या नियोजना संदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी आर. विमला, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी कर्नल परमवीर शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, विशेष कार्य अधिकारी विजय इंगोले यांच्यासह पोलीस व वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

25 ते 30 विमानांचे आकाशातून पथसंचलन

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून क्रीडा व युवक सेवा विभाग व राष्ट्रीय छात्र सेनाच्या संयुक्त विद्यमाने एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या 25 ते 30 विमानांचे आकाशातून पथ संचलन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भारतीय लष्करात भरती होण्याची महत्वाकांक्षा निर्माण होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनी प्रथम क्रमांक मिळालेल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही होणार आहे.

हॉर्स रायडिंगसह साहसी कार्यक्रम

एअरोमॉडेलिंग शोमध्ये विविध साहसी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये हॉर्स रायडिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, एनसीसीचे विविध अत्याधुनिक यंत्र, शस्त्रात्रांची माहितीवर्धक प्रदर्शनी तसेच ॲथलेटिक्स स्टेडियम पॅव्हेलियन इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच एरोमॉडेल्स, वायुसेना, नौदलांचे अत्याधुनिक यंत्रे, शस्त्रात्रे, सेवा तसेच एनसीसी आदी संदर्भात यामध्ये माहिती दिली जाणार आहे.

Nagpur | अर्धवट जळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं! आत्महत्या केल्याचं उघड, का दिला जीव?

Video – फडणवीस, गडकरी यांनी एकमेकांना भरविला विजयाचा पेढा, नागपुरात दोघांचाही जल्लोषात सत्कार

Devendra Fadnavis | गोवा तो झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं; देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात निर्धार

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.