
Ambadas Danve On Mahendra Dalvi: आज सकाळी सकाळीच उद्धव सेनेचे शिलेदार अंबादास दानवे यांनी नोटांचा बॉम्ब टाकला. त्यांनी एक्स खात्यावर सकाळी एका व्हिडिओ कॉलचा संदर्भ देत तीन व्हिडिओ पोस्ट केले. त्यात महेंद्र दळवी दिसत आहेत. एका व्हिडिओत नोटांची बंडलं दिसत आहेत. तर लाल टी शर्ट घातलेली व्यक्ती ओळखू येत नाही. या कॅश बॉम्बमुळे अधिवेशनात मोठी खळबळ उडवून दिली. उद्धव सेना आणि शिंदे सेनेतील वाकयुद्ध रंगले. तर पत्रकार परिषद घेत अंबादास दानवे यांनी मोठा खुलासा केला आहे.
कुणी पाठवला तो व्हिडिओ?
“माझ्याकडे या लोकांशी सबंधित व्यक्तीने हा व्हिडिओ पाठवला. तुम्ही नाव घेतलं त्यासारखी ही व्यक्ती दिसत आहे. समोर असणारा व्यक्तीही कोण हे तपासालं पाहिजे. नोटांची रास तिथे दिसतेय. बँकेत ५० हजार भरले तरी तिथे नोटीस येते. इथे तर नोटांची पूर्ण रास दिसतेय. आताच्या घडीला मी हा व्हिडिओ समोर आणलाय. योग्य चौकशी झाल्यावर सगळं समोर येईल. संजय शिरसाट यांचाही असाही एक व्हिडिओ समोर आला होता. घरातला व्हिडिओ बाहेरची लोक काढू शकतात का? हा व्हिडियोही घरातला वाटतोय. त्या आमदारांना या नोटा कसल्या आहेत सगळं माहिती आहे” असे पत्रकार परिषदेत दानवे यांनी स्फोट केला.
आमदाराच्या राजीनाम्यावर भाष्य
महेंद्र दळवी यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल दानवे यांना विचारले असता, त्यांनी नेटानं उत्तरं दिलं. मी काय कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. आम्ही ५० खोके एकदम ओके म्हणताना त्यांना राग येत होता आता हे ५० खोकेच तर आहेत. या लोकांनी सत्ता आणि संपत्तीचा हैदोस घातलेला आहे. पोलिसांना आपण सांगितल तर पोलिस चौकशी करतील. मी काय वेगळे आरोप करत नाहीये करणारही नाहीये. मला फक्त महाराष्ट्राला हे दाखवायचं आहे, असे दानवे यांनी उत्तर दिलं.
तटकरेंनी पुरवला व्हिडिओ?
आमदार महेंद्र दळवी यांनी दानवे यांना सुनील तटकरे यांनी पुरवल्याचा आरोप केला होता. त्यावर दानवे यांनी संताप व्यक्त केला. तटकरे आणि माझा जवळपास काहीच संवाद नाही. आधी जेंव्हा एकत्र होतो तेंव्हा बोलण व्हायचं आता आमच बोलणं होत नाही, असा खुलासा दानवे यांनी या आरोपांवर केला आहे. महेंद्र दळवी आहे तसेच समोर लाल शर्ट वाली एक व्यक्ती दिसतेय, मला तर वाटत ती मेन व्यक्ती आहे. व्हीडिओत महेंद्र दळवी दिसतायत आणि समोरचा व्यक्ती पोलिसानी शोधावा. मी समोरच्या व्यक्तिलाही ओळखतो म्हणूनच व्हिडिओ ट्विट केलाय. चेहरा दिसत नाही तर तो मी न्हवेच असे म्हणणार ते पोलिसानी शोधावं, असे आवाहन दानवे यांनी केले.