दारू पिण्यासाठी त्याने लढवली शक्कल, पण, या घटनेने त्याची नशाच उतरली, नेमकं काय घडलं?

एका दारुड्याला दारू पिण्यासाठी पैसे लागत होते. त्याची नजर बाईकवर गेली.

दारू पिण्यासाठी त्याने लढवली शक्कल, पण, या घटनेने त्याची नशाच उतरली, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 4:51 PM

नागपूर : दारू पिण्याचा शौक कोणाला कुठं नेईल काही सांगता येत नाही. दारुसाठी काही जण चोऱ्या करतात. काही वेळा चोरीची सवय घरापासून सुरू होती. घरच्या वस्तू विक्री करून दारूसाठी पैसे खर्च केले जातात. त्यानंतर दारूची लत लागल्यास घराशेजारी छोट्यामोठ्या चोऱ्या केल्या जातात. इथूनही कुणाच्या लक्षात आले नाही. तर दारुड्यांची हिंमत वाढते मग ते मोठ्या चोऱ्या करायला लागतात. अशीच एक घटना पाचपावली पोलिसांत उघडकीस आली. एका दारुड्याला दारू पिण्यासाठी पैसे लागत होते. त्याची नजर बाईकवर गेली.

दारुसाठी तो बाईकचोरी करायचा

नागपूरच्या पाचपावली पोलिसांच्या हाती एक चोरटा लागला. त्याला दारू, गांजा पिण्याचा शौक होता. त्याला आपले शौक पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज पडायची. मग ही गरज भागविण्यासाठी त्याने चक्क बाईक चोरीचा उद्योग सुरू केला. नागपूर शहरात वेगवेगळ्या भागात फिरून तो बाईक चोरी करायचा.

हे सुद्धा वाचा

पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली

मात्र एका चोरीच्या घटनेचा तपास पोलीस करत असताना त्यांच्या हाती हा आरोपी लागला. पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पाच गुन्ह्यांची कबुली दिली. त्या पाचही बाईक पोलिसांनी जप्त केल्यात. त्याने आणखी कुठे अशा प्रकारच्या घटना केल्या का ? याचे कोणी साथीदार आहे का?. याचा शोध पोलीस घेत आहेत. अशी माहिती पाचपावलीचे पोलीस निरीक्षक विकास मनपिया यांनी दिली.

त्याने चोरीचा मार्ग शौक पूर्ण करण्यासाठी अवलंबला तर खरा. मात्र आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे. पाचपावली हद्दीत बाईकचोरीच्या घटना वाढल्या होत्या. या बाईक चोरी कोण करतो, याच्या पोलीस मागावर होते. तेवढ्यात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी हंटर लावताच त्याने सर्व माहिती दिली. मला दारू पिण्याची सवय आहे. त्यासाठी पैसे लागत होते. म्हणून मी हा मार्ग स्वीकारला अशी कबुली चोरट्याने दिली. त्यानंतर पाच बाईक आतापर्यंत चोरल्याचं त्याने सांगितलं.

Non Stop LIVE Update
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.