Love breakup लग्नापूर्वीच प्रेमाची ताटातूट, 14 वर्षांनंतर पुन्हा आले एकत्र, अन् नको ते करून बसले

मनीष आणि सोनमच्या लव्ह अफेअरची कुणकुण सोनमच्या नवऱ्याला समजली. त्यामुळं ती मनीषला टाळत होती. त्याने नको त्या अवस्थेतील व्हिडिओ बनवले होते. ते व्हायरल करण्याची धमकी देत होता.

Love breakup लग्नापूर्वीच प्रेमाची ताटातूट, 14 वर्षांनंतर पुन्हा आले एकत्र, अन् नको ते करून बसले
प्रातिनिधिक फोटो

नागपूर : ती 21 वर्षांची, तो 24 चा. ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली. दोघांनीही विवाहासाठी प्रयत्न केले. पण, घरच्यांचा विरोध असल्यानं लग्न होऊ शकलं नाही. कारण जात आडवी आली.

दोघांच्याही प्रेमाचा अंकूर फुटलाच नाही. त्यांनी आपापले रस्ते निवडले. तीनं (सोनम-बदललेलं नाव) दुसऱ्याशी लग्न केलं. त्यानंही (मनीष) दुसरीशी घरोबा केला. त्यानंतर दोघांनाही त्यांच्या-त्यांच्या संसारवेलीवर तीन-तीन अपत्य झाली. त्यामुळं ते खूश होते. पण, मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं. 14 वर्षांनंतर ते पुन्हा भेटले.

14 वर्षांनंतर प्रेमाला फुटू लागले धुमारे

जुन्या प्रेमाचा अंकूर फुटला नव्हता. त्याला आता तब्बल 14 वर्षांनंतर धुमारे फुटू लागले. तो उमरेडचा. लग्न झाल्यानंतर ती जरीपटक्यात नांदायला गेली होती. पण, लॉकडाऊननं दोघांना पुन्हा एकत्र आणलं. त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. तो तिच्यावर बायकोसारखे हक्क दाखवू लागला. कधी उमरेडमध्ये तर कधी नागपुरात पुन्हा भेटू लागले.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

मनीष आणि सोनमच्या लव्ह अफेअरची कुणकुण सोनमच्या नवऱ्याला समजली. त्यामुळं ती मनीषला टाळत होती. त्याने नको त्या अवस्थेतील व्हिडिओ बनवले होते. ते व्हायरल करण्याची धमकी देत होता. तिला त्याला भेटणे शक्य नव्हते. म्हणून तीनं जरीपटका पोलिसांत तक्रार केली. तो मला ब्लॅकमेल करतो आहे, अशी तक्रार झाल्यानं पोलिसांनी मनीष सजन तांबेकर (वय 38) याला अटक केली. खर तर त्याचा व्यवसाय पानटपरीचा. दुसऱ्यांच्या पानाला चुना लावता लावता आता त्यालाच चुना लागला. पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला.

 

घरकाम करणार्‍या महिलेवर अत्याचार

जरीपटका पोलिस ठाणे हद्दीत एका घरकाम करणार्‍या महिलेवर घर मालकाने अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रदीपकुमार अमृतलाल माखिजानी (वय 50) याने त्याच्या घरी 31 वर्षीय महिला घरकाम करण्याकरिता ठेवली होती. आरोपीने 27 ऑक्टोबर 2021 ते 25 नोव्हेंबर 2021 च्या दरम्यान पीडित महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच तिला तिच्या कामाचा दोन महिन्यांचा पगार दिला नाही, अशी तक्रार आहे.

Nagpur Corona चिंतेत भर, 13 पॉझिटिव्ह-53 सक्रिय, तीन आठवड्यांतील उच्चांक

Nagpur Administration भीती ओमिक्रॉनची, प्रशासन लागले कामाला, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरू करण्याच्या सूचना

 

Published On - 11:36 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI