AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षणाबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात मोठी घोषणा

मराठा आरक्षणाच्याबाबत एक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी मोठी घोषणा केली. त्यामुळे आता आगामी काळात काय-काय घटना घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठा आरक्षणाबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात मोठी घोषणा
| Updated on: Dec 19, 2023 | 6:39 PM
Share

नागपूर | 19 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्याबाबत एक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आणखी एक मोठी घोषणा केली. मराठा आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलवणार आहे. राज्य मागासवर्ग आयोग आपला अहवाल महिन्याभरात देणार आहे. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेतलं जाईल, अशी मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

“मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण मिळवून द्यायचं आहे. राज्य सरकार सर्व शक्ती पणाला लावत आहे. राज्य मागासवर्ग महिन्याभरात आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधी मंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी देतो”, असं एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले.

‘मी जो संकल्प करतो, तो संकल्प पूर्ण करतो’

“ओबीसी समाजाला धक्का न लावता, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत. आम्ही अनेकदा बोललो, तरी संभ्रम, शंका काही लोकांच्या निर्माण होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमच्याकडून जे जे होईल ते करु. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. ही शपथ कोणत्याही समाजावर प्रसंग आला असता तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असती. जो समाज अडचणीत आहे त्याच्यापाठीमागे आपण आहोत. मी जो संकल्प करतो, तो संकल्प पूर्ण करतो हे महाराष्ट्राने एक-दीड वर्षापूर्वी पाहिलेलं आहे”, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्र्यांची नाना पटोलेंचा उल्लेख करुन टोलेबाजी

“सरकार पूर्ण सकारात्मक आहे. नानाभाऊ सगळं करायला धाडस लागतं. घाबरुन घाबरुन कुणी करत नाही. अरे डू ऑर डाय”, अशी मिश्किल टिप्पणी एकनाथ शिंदेंनी केली. “जे लोकांच्या मनात होतं, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं ते एकनाथ शिंदेने केलं. दीड वर्षात या सरकारने केलेली कामगिरी तुमच्यासमोर आहे. नानाभाऊ अजित दादांनी काय सांगितलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे अजित दादा विकासाबरोबर आलेले आहेत. कुणाच्याही मनाच संभ्रम निर्माण होता नये. नोंदी 1967 पूर्वीच्या आहेत. ज्या नोंदी जु्न्या सापडल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना ओबीसी प्रमाणपत्रे मिळतील. कुणाला न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.