टेन्शन वाढले! नागपूर, औरंगाबादेत रुग्ण आणि मृत्यू संख्या वाढली; कोल्हापूर- नागपूर 12 मार्चपासून सुरू होणार

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात वाढलेला कोरोनाचा धोका अद्यापही कमी होताना दिसत नाही. (corona cases rise in nagpur, kolhapur and aurangabad)

टेन्शन वाढले! नागपूर, औरंगाबादेत रुग्ण आणि मृत्यू संख्या वाढली; कोल्हापूर- नागपूर 12 मार्चपासून सुरू होणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 8:23 AM

नागपूर: गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात वाढलेला कोरोनाचा धोका अद्यापही कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत नागपूरमध्ये 1116 नवे रुग्ण सापडले आहेत. तर औरंगाबादमध्ये 75, कोल्हापुरात 51 आणि पिंपरी-चिंवडमध्ये 453 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच नागपूरमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाने 13, औरंगाबादमध्ये 4 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 3 जण दगावले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच कोल्हापूर आणि नागपूरमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढलेली असतानाही कोल्हापूर-नागपूर रेल्वे सुरू होणार आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. (corona cases rise in nagpur, kolhapur and aurangabad)

नागपुरात दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा दोन अंकी

नागपुरात गेल्या 24 तासात 1116 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1028 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, काल दिवसभरात नागपुरात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच नागपुरात मृतांचा आकडा दोन अंकी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण 10611 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या वारसांना नोकरी

कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागपूरमधील आठ पोलिसांच्या वारसांना पोलीस दलात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली आहे. या सर्वांची पोलीस शिपाई म्हणून पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये काही वारसांना तीन तर काही वारसांना सहा महिन्यात नोकरी मिळाली आहे. कोरोनामुळे घरचा आधार गेल्याने खचलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना यामुळे मोठा आधार मिळाला आहे.

औरंगाबादेत 275 जणांना कोरोनाची लागण

औरंगाबादमध्ये काल एका दिवसात 275 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बाधितांचा एकूण आकडा 46793 वर गेला आहे. सध्या या रुग्णालयात 1511 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काल दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय जिल्ह्याततील साडेपाच लाख नागरिकांचे होणार लसीकरण होणार आहे. जिल्ह्यातील 60 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. येत्या 1 मार्चपासून या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून उद्यापासून लसीकरण नोंदणीस सुरुवात करण्यात येणार आहे.

कोल्हापुरात रुग्णांची संख्या वाढतेय

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 51 नवे रुग्ण सापडले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात सध्या 223 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. दरम्यान, एकीककडे कोल्हापूर आणि नागपूरमध्ये कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असताना कोल्हापूर-नागपूर रेल्वे 12 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे गेल्या 11 महिन्यांपासून ही रेल्वे बंद होती. आठवड्यातून दोन वेळा ही लोकल धावणार आहे. मात्र, कोरोनामुळे बंद झालेली लोकल कोरोना वाढत असतानाच सुरू होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोल्हापूर-धनाबाद एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर कोल्हापुरातून आणखी एक लांबपल्ल्याची गाडी धावणार आहे.

पिंपरीत 19 ठिकाणी कंटन्मेंट झोन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भागात कोरोना मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या ‘ब’, ‘ड’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत असून 19 भाग कंटेन्मेट झोन घोषित केले आहेत. तर 11 रुग्ण सापडल्याने चिंचवडमधील मोरया गोसावी राजपार्क सोसायटी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केली असून पूर्णपणे सील केली आहेत. शहरात एकूण 3164 रुग्ण सक्रिय असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 2427 रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहेत, त्यापैकी 45 रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. आयसीयू व व्हेंटिलेटरवर 24 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच शहरात आजपर्यंत 18 हॉटेलवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

कोरोना विषयक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून एकूण 1 कोटी 64 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून एकूण 8 लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, असंही आयुक्त पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, काल पिंपरी-चिंचवडमध्ये 453 कोरोना रुग्ण सापडले असून तीनजण दगावले आहेत. तसेच 457 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत पिंपरी-चिंडवडमध्ये 1,04503 रुग्ण सापडले असून 99,510 कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 1836 रुग्ण दगावले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या 1168 खाटा शिल्लक आहेत. तसेच कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अतिदक्षता विभाग कोरोना रुग्णांसाठी राखीव असलेली रुग्णालय असे मिळून शहरात एकूण 2575 खाटा आहेत. सध्या त्यापैकी 1107 रुग्ण उपचार घेत आहेत. (corona cases rise in nagpur, kolhapur and aurangabad)

संबंधित बातम्या:

धोका वाढला! नव्या कोरोना रुग्णांची फुफ्फुस लवकर होतायत खराब

नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

पोहरादेवीमध्ये संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनानंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

(corona cases rise in nagpur, kolhapur and aurangabad)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.