Sunil Kedar: नागपुरात अंडी उबवण केंद्र नवीन इमारत व पक्षीगृहांचे लोकार्पण, सुनील केदार म्हणतात, पशुसंवर्धन विभागाचे कार्य संस्मरणीय

पश्चिम महाराष्ट्रात दुग्धव्यवसाय प्रगती पथावर आहे. त्याच धर्तीवर विदर्भात या पूरक व्यवसायास चालना द्या. शासकीय कॅटलफिल्डचा कारखाना नागपुरात आणणार असल्याचे केदार यांनी सांगितले. पशुसंवर्धन मंत्र्यांनी नेहमी पाठपुरावा करुन पशु विमा योजनेसाठी केंद्रात पाठपुरावा केला. त्यामुळेच पशुपालकांना हा विमा मिळणार आहे.

Sunil Kedar: नागपुरात अंडी उबवण केंद्र नवीन इमारत व पक्षीगृहांचे लोकार्पण, सुनील केदार म्हणतात, पशुसंवर्धन विभागाचे कार्य संस्मरणीय
नागपुरात अंडी उबवण केंद्र नवीन इमारत व पक्षीगृहांचे लोकार्पण
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 8:02 PM

नागपूर : ग्रामीण अर्थव्यवस्था हा मूलभूत विषय घेऊन ग्रामीण भागाचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण होतकरुंना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेळी वाटप, कुक्कुट पालनाचे उद्योग राबवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. या उपक्रमास राज्याने सुध्दा अंगिकारले आहे. हे कार्य नेहमी संस्मरणी राहील, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत (Administrative Building) बांधकामाचा भूमिपूजन व प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथील नवीन पक्षीगृह (New Aviary) व कुक्कुट प्रशिक्षण केद्रांच्या (Poultry Training Center) नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

अंड्यांमुळे मानवी शरीरात प्रोटिन्स पुरवठा

कोरोना काळात राज्यातील सर्व उद्योग, व्यवसाय बंद पडले होते. त्यावेळी कृषी व पशुपालन हाच एकमेव व्यवसाय सुरु होता. त्यामुळे राज्याला महसूल मिळाला आहे. शासकीय कुक्कुट उद्योगाद्वारे निर्मित दीड कोटी अंडी इतर राज्यात देण्यात येत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या अनेक योजनाद्वारे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. यामुळेच गावची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा दृढविश्वास श्री. केदार यांनी व्यक्त केला. अंड्यामुळे मानवी शरीरास प्रोटिन्सचा पुरवठा होतो. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यासही मदत होते. पशुसंवर्धन विभागाचे उपक्रम योग्य रितीने राबवा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पशुपालकांना मिळणार कुक्कुट प्रशिक्षण

पश्चिम महाराष्ट्रात दुग्धव्यवसाय प्रगती पथावर आहे. त्याच धर्तीवर विदर्भात या पूरक व्यवसायास चालना द्या. शासकीय कॅटलफिल्डचा कारखाना नागपुरात आणणार असल्याचे केदार यांनी सांगितले. पशुसंवर्धन मंत्र्यांनी नेहमी पाठपुरावा करुन पशु विमा योजनेसाठी केंद्रात पाठपुरावा केला. त्यामुळेच पशुपालकांना हा विमा मिळणार आहे. त्यासोबतच केज योजना सर्व राज्यात लागू करण्यात येणार आहे. कुक्कुट प्रशिक्षक केंद्रामुळे पशुपालकांना हजारोच्या संख्येने येथेच प्रशिक्षण देणे सोयीचे होणार आहे.

हे सुद्धा वाचा

पशुधन विकास मंडळ कार्यालयाचे भूमिपूजन

प्रारंभी वळू संगोपन केंद्रातील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर कार्यालयाच्या 6 कोटी 25 लाख रुपये किमतीच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन श्री. केदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सेमिनरी हिल्स येथील 6 कोटी 40 लक्ष रुपये किंमतीच्या प्रादेशिक अंडी उबवण केंद्राच्या नवीन इमारत व 1 कोटी 43 लाख रुपये किंमतीच्या पक्षीगृहांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी श्री. केदार यांनी गोट शेडला भेट दिली व तेथील वळूची माहिती जाणून घेतली.

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.