Video : Akola ShivSena | अकोल्यात घरकुल बांधकामाच्या मागणीसाठी शिवसेनेचा मोर्चा, पोलीस-कार्यकर्त्यांची झटापट, गेटवर चढून आत प्रवेश

जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत शिवसेनेचे कार्यकर्ते महापालिकेवर धडकले. हे पाप कुणाचे तर, भारतीय जनता पार्टीचे अशा घोषणा देण्यात आल्या. गरिबांना घरकूल मिळाला पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. मनपाची गेट बंद करण्यात आली होती. पोलिसांचा बंदोबस्त होता. तरीही कार्यकर्ते गेटवर चढले. एकापाठोपाठ एक कार्यकर्ते गेटवरून चढले.

Video : Akola ShivSena | अकोल्यात घरकुल बांधकामाच्या मागणीसाठी शिवसेनेचा मोर्चा, पोलीस-कार्यकर्त्यांची झटापट, गेटवर चढून आत प्रवेश
अकोल्यात घरकुल बांधकामाच्या मागणीसाठी शिवसेनेचा मोर्चा
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 7:37 PM

अकोला : शहरात अकोला शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांची चांगलीच झटापट झाली. कार्यकर्ते गेटवर चढले. पोलिसांनी न जुमानता मनपा कार्यलयात प्रवेश केला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (Prime Minister’s Housing Scheme) 68 हजार 282 घरकुलांचे (Gharkul) अर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर बांधकाम का केले नाही. त्याचा खुलासा करावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा (Rajesh Mishra) यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या गेटवर चढून आतमध्ये  प्रवेश केला.

मोर्च्यात नेमकं काय घडलं

जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत शिवसेनेचे कार्यकर्ते महापालिकेवर धडकले. हे पाप कुणाचे तर, भारतीय जनता पार्टीचे अशा घोषणा देण्यात आल्या. गरिबांना घरकूल मिळाला पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. मनपाची गेट बंद करण्यात आली होती. पोलिसांचा बंदोबस्त होता. तरीही कार्यकर्ते गेटवर चढले. एकापाठोपाठ एक कार्यकर्ते गेटवरून चढले. त्यानंतर गेट खोलण्यात आले. पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. कार्यकर्त्यांनी गेट खोलून आतमध्ये प्रवेश केला. पोलीस गेट बंद करण्याचा प्रयत्न करत होते. पण, कार्यकर्ते ती गेट उघडत होते. कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच झटापट झाली. या आंदोलनात महिलांचाही समावेश होता.

हे सुद्धा वाचा

61 हजार लोकांचं काय

राजेश मिश्रा म्हणाले, घरकुल योजना आली. तेव्हा मोदींना सांगितलं होतं की, 2022 पर्यंतच घरकुल मिळणार. अकोला शहरात गाजावाजा करण्यात आला. जणू काही दोन महिन्यांत सर्वांना घरं मिळणार. भाजपची सत्ता होती. 68 हजार लोकांचा सर्वे झाला. सात हजार लोकांना घरं मंजूर झाले. पण, अद्याप त्यांना घरकूल मिळालेलं नाही. शिवाय 61 हजार लोकांचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या 61 हजार लोकांना पत्र पाठविण्यात येणार आहेत. ते लोकं घरकुल योजनेसाठी पात्र आहेत की, आपात्र आहेत. पात्र झालेल्या सात हजार लोकांची महापालिका लिस्ट लावणार आहेत. त्यानंतर लवकरात लवकर घरकुलाचं काम सुरू करणार आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी तीन महिन्यात प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.