AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परीक्षेचं टेंशन आलंय घाबरू नका! नागपूर विभागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर

बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. दहावीच्याही परीक्षा लवकरच सुरू होत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना बहुधा टेंशन येतं. आता बोर्डीची परीक्षा कशी द्यायची, याची भीती वाटत असेल, तर घाबरू नका. खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा नि टेंशनफ्री होऊन पेपर सोडवा.

परीक्षेचं टेंशन आलंय घाबरू नका! नागपूर विभागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर
बारावीच्या केमिस्ट्रीचा पेपरफुटीचा प्रकार नाही तर कॉपीचा प्रकार,Image Credit source: tv 9
| Updated on: Mar 11, 2022 | 6:30 AM
Share

नागपूर : मार्च, एप्रिल हा परीक्षांचा महिना. या काळात विद्यार्थ्यांना तसेच पालकांना काही समस्या उद्भवतात. त्या समस्या सोडविण्यासाठी काही समुपदेशक नियुक्त (Appointed Counselor) केले जातात. हे समुपदेशक विद्यार्थी तसेच पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करतात. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. परीक्षा म्हटली की काही विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते, ही भीती घालविण्याचे काम हे समुपदेशक करत असतात. उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची धामधूम सुरू आहे. या कालावधीत नागपूर विभागात जिल्हास्तरावर (District Level in Nagpur Division) विद्यार्थी व पालकांच्या परीक्षेविषयीच्या समस्या, तक्रारी (Problems, Complaints) सोडविण्यासाठी समुपदेशन व हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. समुपदेशन केंद्र परीक्षेपूर्वी एक आठवडा सुरू झाले आहे. परीक्षेच्या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत समुपदेशन सुरू राहील.

खाली दिलेल्या क्रमांकावर फोन करा

प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी दोन असे एकूण 12 समुपदेशक शंकानिरसन करतील. नागपूर येथील विशाल गोस्वामी, शारदा महाविद्यालय (8275039252) व प्रतिमा मोरे, बालाजी हायस्कूल हिंगणा (9028066633), वर्धा जिल्ह्यातील पी. के. शेकार, यशवंत विद्यालय, ( 9766917338) व वि. दा. पाटील, इंदिरा हायस्कूल (9823438205) हे समुपदेशन करतील. भंडारा जिल्ह्यातील गायत्री भुसारी, समर्थ महाविद्यालय (9011062355) व नरेंद्र वाघमारे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (9405517541) तर गोंदिया जिल्ह्यातून मिलिंद रंगारी, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व व्यावसायिक विकास संस्था (9404860735), एल. एच. लांजेवार, श्री गुरुदेव विद्या मंदिर (7507099136) हे समुपदेशन करतील. चंद्रपूर जिल्ह्यातील मातोश्री विद्यालयाचे सतीश पाटील (9421914353) व आर. एन. रहाटे (7588890187) आणि गडचिरोली जिल्ह्यात डी. एम. जवंजाळ, रेणुकाबाई उके हायस्कूल ( 9421817089) व ए. एल. नुतीलकंठावार, लक्ष्मीबाई कन्या हायस्कूल (9421732956) हे समुपदेशन करतील. काही समस्या किंवा तक्रारी असल्यास संपर्क करता येईल.

आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांनी केली विमानतळाची सैर, भंडाऱ्यातील जिल्हाधिकारी कदम यांचा पुढाकार

Buldhana | समृद्धीच्या कंत्राटदाराला 21 कोटी 64 लाख रुपयांचा दंड, तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात दिलंय नेमकं कारण

नागपुरात शनिवार, रविवार चित्रपटांची मेजवाणी, सहावे ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.