AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Child Death : खेळता खेळता टीव्हीच्या सेटअप बॉक्सला हात लागला, पुढे जे घडलं ते भयंकर

चार वर्षाचा मुलगा घरात खेळत होता. मात्र खेळत खेळता जे घडलं त्यानंतर सारं कुटुंब शोकात बुडालं.

Nagpur Child Death : खेळता खेळता टीव्हीच्या सेटअप बॉक्सला हात लागला, पुढे जे घडलं ते भयंकर
सेटअप बॉक्सचा शॉक लागल्याने बालकाचा मृत्यूImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Aug 09, 2023 | 9:52 AM
Share

नागपूर / 9 ऑगस्ट 2023 : नागपूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. घरातील टीव्हीच्या सेटअप बॉक्सला हात लावताच शॉक लागून 4 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. हिंगणा तालुक्यातील खैरी पन्नासे गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे. घरातील इलेक्ट्रिक वस्तूंपासून मुलांना दूर ठेवणे आवश्यक आहे हे या घटनेतून कळते. अन्यथा मुलांकडे थोडे दुर्लक्ष करणे हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खेळता खेळता सेटअप बॉक्स खेचला

हिंगणा तालुक्यातील खैरी पन्नासे गावातील चव्हाण कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली. चव्हाण यांचा 4 वर्षाचा मुलगा घरी खेळत होता. खेळता खेळता मुलगा टीव्हीजवळ गेला. त्यानंतर टीव्हीचा सेटअप बॉक्स हातात घेऊन ओढू लागला. यावेळी त्याला शॉक लागला आणि तो बोशुद्ध पडला. घरच्यांनी त्याला तात्काळ हिंगणा रुग्णालयात रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हे ऐकताच आई-वडिलांना धक्का बसला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.