Buldhana Crime : ‘तू माझ्याविरोधात केस का टाकली’ विचारत पत्नीवर हल्ला, मुलीच्या बचावासाठी सासू आली म्हणून…

पती-पत्नीमध्ये वाद होता. या वादाला कंटाळून पत्नी माहेरी आली. मग पतीही तिच्या माहेरी आला आणि भलतंच करुन बसला.

Buldhana Crime : 'तू माझ्याविरोधात केस का टाकली' विचारत पत्नीवर हल्ला, मुलीच्या बचावासाठी सासू आली म्हणून...
वैवाहिक वादातून पतीकडून पत्नी आणि सासूवर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 9:56 AM

बुलढाणा / 9 ऑगस्ट 2023 : पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीसह सासूवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. या हल्ल्यात पत्नी आणि सासू जखमी झाल्या आहेत. याबाबत जळगाव जामोद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. जखमी मायलेकींना उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथे ही भयंकर घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी नितीनविरोधात कलम 307, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काय घडलं नेमकं?

खामगाव तालुक्यातील लक्कडगंज येथे राहणारा नितीन तायडे याचा जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथील पूजा हिच्याशी 8 वर्षापूर्वी विवाह झाला होता. मात्र नितिनला दारुचे व्यसन असल्याने त्याच्यात आणि पूजामध्ये नेहमी वाद व्हायचे. रोजच्या वादाला कंटाळून पूजा ही माहेरी राहत आहे. पूजाने पतीकडून पोटगी मिळावी म्हणून कोर्टात खटला दाखल केला आहे. यामुळे नितीन चांगलाच संतापला. संतापाच्या भरात काल तो झाडेगावला पत्नीच्या माहेरी आला.

नितीनने पत्नी हिला तू माझ्या विरोधात पोटगीची केस का टाकली विचारत, आता तुम्हाला हिसका दाखवतो म्हणत खिशातून चाकून काढला. चाकूने पत्नीवर जोरदार हल्ला सुरु केला. जीवे मारण्याच्या उद्देशाने पूजाच्या छातीवर, मानेवर आणि पाठीवर चाकूने वार करत तिला गंभीर जखमी केले. मुलीवर हल्ला होताना पाहून पूजाची आई तिला सोडवण्यासाठी मध्ये पडली. यामुळे नितीनने तिलाही पोटात चाकू मारुन जखमी केले. घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. जखमी पूजा आणि तिच्या आईला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या मायलेकींवर उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी
योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी.
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर.
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ.
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट.
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.