नागपूर मनपा शाळेतील सुपर 75 विद्यार्थ्यांना शिकवणी मोफत, ऑनलाईन अभ्यासासाठी आणखी काय?

या टॅबचा उपयोग आपले भविष्य घडविण्यासाठी करा. असे आवाहन यावेळी महापौरांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच पालकांनी घरी मुलांकडे लक्ष द्यावे. त्यांचा अभ्यास घेण्यास सांगितले. टॅब सोबतच इंटरनेटची सुविधा सुद्धा मनपाद्वारे विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार आहे.

नागपूर मनपा शाळेतील सुपर 75 विद्यार्थ्यांना शिकवणी मोफत, ऑनलाईन अभ्यासासाठी आणखी काय?
टॅब वितरणाप्रसंगी विद्यार्थ्यांसह महापौर दयाशंकर तिवारी.
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 4:20 PM

नागपूर : मनपाच्या सुपर- 75 विद्यार्थ्यांना (Corporation’s Super-75 students) शिकवणी वर्गासोबतच ऑनलाईन शिक्षण सुद्धा घेता येणार आहे. यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे (Education Department of Nagpur Municipal Corporation) शनिवारी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते टॅबचे वितरण करण्यात आले. महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, मनपाच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही कमी राहणार नाही, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना घडविण्यात येत आहे. मनपाच्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाशी जोडून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना टॅब (Two thousand students tab) देण्यात आले. सुपर-75 विद्यार्थ्यांनासुद्धा ऑनलाईन शिक्षण घेता यावे. शिकवणी वर्गाव्यतिरिक्त घरीसुद्धा विविध शैक्षणिक अप्लिकेशनच्या माध्यमातून शिकता यावे. यासाठी त्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला. या टॅबचा उपयोग आपले भविष्य घडविण्यासाठी करा. असे आवाहन यावेळी महापौरांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच पालकांनी घरी मुलांकडे लक्ष द्यावे. त्यांचा अभ्यास घेण्यास सांगितले. टॅब सोबतच इंटरनेटची सुविधा सुद्धा मनपाद्वारे विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार आहे.

मनपा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा

शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, मनपाचे विद्यार्थी कुठेही मागे नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते सुद्धा प्राविण्य श्रेणीत येऊ शकतात. हे मागील दोन वर्षात मनपाच्या विद्यार्थ्यांनी करून दाखविले. शहरातील नागरिकांचा मनपा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी मेरिटमध्ये कसे येतील, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच यावर्षी मनपा शाळांतील दहावीचा निकाल शंभर टक्के लागेल, असा विश्वास प्रा. दिलीप दिवे यांनी व्यक्त केला.

इंटरनेटची सुविधासुद्धा मनपा पुरविणार

प्रास्ताविकेत शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर यांनी सांगितले की, टॅबचा उपयोग करण्याबाबत विद्यार्थ्यांचा एक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येईल. तसेच या टॅबमध्ये शैक्षणिक ॲपशिवाय अन्य कोणतेही ॲप सुरू होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी टॅबचा वापर अभ्यासासाठी, शैक्षणिक कामासाठी करा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. टॅबमध्ये लागणारे सर्व ॲप शिक्षण विभागाद्वारे देण्यात येतील. इंटरनेटची सुविधा सुद्धा मनपातर्फे पुरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढे त्या म्हणाल्या, ‘सुपर-75’ ची दुसरी बॅच सुरू करण्यासाठी लवकरच आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन दुसरी बॅच सुरू करण्यात येणार आहे.

Nagpur Crime | नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू; शेतात विद्युत करंट लावण्याचे कारण काय?

Nagpur | एका सुरेल युगाचा अंत; लतादीदींच्या निधनावर डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला शोक

नागपुरातील रस्त्यांच्या सफाईसाठी मेकॅनिकल रोड स्विपिंग मशीन; रात्रीच्या वेळी होणार प्रमुख मार्गांची स्वच्छता

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.