AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलही गेले, तूपही गेले, हाती… अमेरिकेचे स्वप्न भंगले, डंकी मार्गाने गेलेला तरुण नागपूरला परतला

Illegal Indian Immigrants Nagpur Man Dunki Way : अमेरिकेन काल अवैध भारतीय प्रवाशाना भारतात परत पाठवले. अमेरिकन विमान त्यांना घेऊन भारतात आले. त्यात नागपूरमधील एक तरुणाचे अमेरिकेचे स्वप्न भंगलेच नाही तर त्याला मोठा आर्थिक फटका बसला.

तेलही गेले, तूपही गेले, हाती... अमेरिकेचे स्वप्न भंगले, डंकी मार्गाने गेलेला तरुण नागपूरला परतला
नागपूरमधील तरुणाचे स्वप्न भंगले
| Updated on: Feb 07, 2025 | 10:48 AM
Share

‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले’, अशी म्हण आपण अनेकदा ऐकतो. तर या म्हणीचा प्रत्यय नागपूरमधील एका तरुणाला आला आहे. अमेरिकेन काल अवैध भारतीय प्रवाशाना भारतात परत पाठवले. अमेरिकन विमान त्यांना घेऊन भारतात आले. त्यात नागपूरमधील एक तरुणाचे अमेरिकेचे स्वप्न भंगलेच नाही तर त्याला मोठा आर्थिक फटका बसला. या तरुणाचे जवळपास 50 लाख रुपये गेले. त्याला प्रवासादरम्यान जो त्रास सहन करावा लागला, तो वेगळाच. देशात परतल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याची चौकशी केली.

हरप्रीतला 50 लाखांचा पटका

नागपूरमधील हरप्रीतसिंह ललिया हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता. त्याला अमेरिकेची भुरळ होती. त्यातूनच डंकी मार्गाने अमेरिकेत जाण्याचे स्वप्न त्याने पाहिले. त्यासाठी त्याने रक्कमे जुळवली. डंकी मार्गाने अमेरिकेत जाण्यासाठी त्याने एजंटला दोन टप्प्यात पैसे दिले. अगोदर 18 लाख तर दुसर्‍या टप्प्यात 31 लाख 50 हजार रुपये दिले. कॅनडामार्गे त्याचा प्रवास सुरू होणार होता. पण झाले उलटेच.

पाठवलं ग्वाटामालेला

हरप्रीतसिंह यांच कॅनडाचा व्हिसा तयार करण्यात आला. पण त्याला अगोदर इजिप्तला पाठवण्यात आले. गेल्यावर्षी 2 डिसेंबर रोजी तो इजिप्तला गेला. तेथून त्याला स्पेनची राजधानी माद्रिदला गेला. तेथून त्याला कॅनडाला पाठवण्यात आलं. पण दक्षिण अमेरिकेतली ग्वाटेमाला येथे उतरवण्यात आलं. तिथे त्याला माफियासोबत राहावे लागले.  त्यांच्याकडे बंदुका होत्या.

ग्वाटेमाला येथे त्याला 27 डिसेंबरपर्यंत थांबवण्यात आले. त्यानंतर त्याला विमानाने निकारागुवाला येथे नेण्यात आले. तिथून कारने होंडूरास या देशात नेण्यात आले. पुढे ग्वाटेमाल येथील निर्जनस्थळी नेण्यात आले. तिथून नदीमार्गे त्याला मॅक्सिको देशात नेण्यात आले. तिथे तो दहा दिवस माफियांच्या ताब्यात राहावे लागले. त्याच्यासोबत सतत बंदुकधारी होते. तिथून त्याला कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागली. मॅक्सिको-अमेरिका सीमारेषा ओलांडून तो अमेरिकेत पोहचला. पण त्याला सुरक्षा दलांनी अटक केली. त्याला विमानाने भारतात परत पाठवण्यात आले. नागपूरमधील पाच पावली पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...