AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची नागपुरात सभा; या भाजप नेत्याने सभेची परवानगी रद्द करण्याची का केली मागणी

या सभेला महाविकास आघाडीचे मोठे नेते एकत्र येतील. या सभेच्या माध्यमातून भाजप-शिंदे सरकारवर टीका केली जाईल. या सभेसाठी एनआयटीने परवानगी दिली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची नागपुरात सभा; या भाजप नेत्याने सभेची परवानगी रद्द करण्याची का केली मागणी
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 11:45 AM

नागपूर : नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. १६ एप्रिल रोजी या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला महाविकास आघाडीचे मोठे नेते एकत्र येतील. या सभेच्या माध्यमातून भाजप-शिंदे सरकारवर टीका केली जाईल. या सभेसाठी एनआयटीने परवानगी दिली आहे. परंतु स्थानिकांनी या सभेला विरोध केलाय. ज्या मैदानात ही सभा होत आहे तो मैदान खेळासाठी राखीव आहे. त्यामुळे या ठिकाणी सभा होऊ नये असं स्थानिक तसेच खेळाडूंचं म्हणण आहे. आमदार कृष्णा खोपडे यांनी हा मुद्दा उचलून धरला. ही सभा रद्द करावी. सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.

परवानगी एनआयटीने रद्द करावी

नागपुरातील महाविकास आघाडीच्या १६ तारखेच्या सभेला भाजपनं विरोध केलाय. नागपुरातील दर्शन कॉलोनी मैदानात वज्रमुठ सभा घेण्यास विरोध करण्यात आलाय. भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि भाजप माजी नगरसेवकांनी NIT ला पत्र पाठवून परवानगी रद्द करण्याची मागणी केली. महाविकास आघाडीच्या सभेला दिलेली परवानगी NIT ने रद्द करावी, यासाठी आमदार खोपडे यांनी पत्र लिहीलं.

हे सुद्धा वाचा

स्थानिक खेळाडूंचा सभेला विरोध

स्थानिक खेळाडू आणि नागरिकांकडूनंही वज्रमुठ सभेला विरोध होतोय. आरक्षित असलेल्या मैदानात सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी भाजप नेत्यांनी केली. महाविकास आघाडी मात्र सभा घेण्यावर ठाम आहे. नागपुरातील सभेत उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती असणार आहे.

भाजपचे शहर अध्यक्ष म्हणतात,…

महाविकास आघाडीची १६ तारखेला नागपुरात वज्रमुठ सभा आहे. या सभेसाठी NIT ने पूर्व नागपुरातील दर्शन कॅालनी मैदानात परवानगी दिलीय. पण स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सभेची परवानगी रद्द करावी यासाठी एनआयटीला पत्र दिलंय. खेळासाठी मैदान आरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.

स्थानिक नेत्यांचा विरोध महाविकास आघाडीने दूर करावा आणि सभा घ्यावी. भाजपचा याला विरोध नाही. पण स्थानिक नेत्यांचा विरोध दूर करावा, असं मत भाजप शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी व्यक्त केलंय.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?.
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; पर्यटकांना वाचवण्यासाठी पूल कापला
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; पर्यटकांना वाचवण्यासाठी पूल कापला.
खंत वाटते वडील सोडून गेले... वैभवी देशमुख जाण्यानं भावूक
खंत वाटते वडील सोडून गेले... वैभवी देशमुख जाण्यानं भावूक.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; मुख्यमंत्री फडणवीसाची मोठी प्रतिक्रिया
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; मुख्यमंत्री फडणवीसाची मोठी प्रतिक्रिया.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, बचावकार्यासाठी NDRF टीम दाखल
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, बचावकार्यासाठी NDRF टीम दाखल.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, कारण आलं समोर? 20-25 जणं गेले वाहून
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, कारण आलं समोर? 20-25 जणं गेले वाहून.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 20-25 जण वाहून गेल्याची भीती, 6 दगावले
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 20-25 जण वाहून गेल्याची भीती, 6 दगावले.
उंच लाटा उसळणाऱ्या लाटा अन् मुंबईकरांची मरिन ड्राइव्हवर गर्दी
उंच लाटा उसळणाऱ्या लाटा अन् मुंबईकरांची मरिन ड्राइव्हवर गर्दी.
शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात.. गोगावलेंच्या दाव्यानं खळबळ
शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात.. गोगावलेंच्या दाव्यानं खळबळ.