Maharashtra MLC Election: भाजपला राज्यसभेत जे शक्य झालं ते आता होणार नाही; विजय वडेट्टीवारांचे नेमके संकेत काय?

Maharashtra MLC Election: महाविकास आघाडी विधान परिषद निवडणूक एकत्र लढत आहे. आम्हीही मतदारांशी संपर्क साधत आहोत. मतदारांशी संपर्क साधणे काही गैर नाही.

Maharashtra MLC Election: भाजपला राज्यसभेत जे शक्य झालं ते आता होणार नाही; विजय वडेट्टीवारांचे नेमके संकेत काय?
भाजपला राज्यसभेत जे शक्य झालं ते आता होणार नाही; विजय वडेट्टीवारांचे नेमके संकेत काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 10:24 AM

नागपूर: राज्यसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विधा परिषद निवडणुकीत (Maharashtra MLC Election) अपयश येऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे नेते कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस (congress)  नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपला राज्यसभा निवडणुकीत जे शक्य झालं ते विधान परिषद निवडणुकीत शक्य होणार नाही, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टावार यांच्या या विधानामुळे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार नसल्याचं वडेट्टीवार यांच्या या विधानातून स्पष्ट होत आहे. मात्र, विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतरच याबाबतचं अधिक चित्रं स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे आमदार फुटू नये म्हणून आघाडी आणि भाजपने आपआपल्या आमदारांना हॉटेलात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडी विधान परिषद निवडणूक एकत्र लढत आहे. आम्हीही मतदारांशी संपर्क साधत आहोत. मतदारांशी संपर्क साधणे काही गैर नाही. आमचे सहा आमदार निवडणूक येतील. भाजपला जे राज्यसभा निवडणूकीत शक्य झालं ते आता होणार नाही. काल महाविकास आघाडीची बैठक झाली, त्यात तिन्ही पक्ष मिळून विधानपरिषद निवडणूक लढण्याचा निर्णय झाला, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थ्यांचं लसीकरण वाढवा

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत. पण नव्या व्हेरियंटचे रुग्ण नाहीत. कोरोना वाढत असला तरीही सध्या तरी राज्यात निर्बंध नाही. शाळा बंद होणार नाही किंवा शाळेवर कुठलेही निर्बंध आणण्याचा विचार नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. शाळांमध्ये मुलांचं लसीकरण वाढवण्यात येणार आहे. कोरोना वाढतोय त्यामुळे लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सांगता येत असते का?

राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनीही विधान परिषद निवडणुकीसंदर्भात विधान केलं आहे. पसंतीचे व्होट आहे. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक असा आहे. पहिल्या क्रमांकाचे व्होट शिवसेनेला दिल्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी राष्ट्रवादीने संपर्क केला असेल, मदत मागितली असेल त्यात वावगं काय? फोडाफोडी शिवाय राजकारणच होत नाही. राजकारणात फोडाफोडी नवीन नाही. राजकारणात फोडाफोडी नाही तर मिलन होत असते काय? आमचा उमेदवार असता तर आम्हीही आमदार फोडले असते. देवेंद्र फडणवीस यांना म्हटले असते तुम्ही एक मत आम्हाला मारा फोन आला तर सांगता येत असते का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.