Nagpur Medical | नागपुरात मेयो, मेडिकलची आरोग्यसेवा कोलमडली, परिचारिकांच्या संपाचा पाचवा दिवस, रुग्णांच्या शस्त्रक्रियांना थांबा

अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षकांचे कार्यालय कुलूपबंद आहे. कोलमडलेली रुग्णसेवा सुधारण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून येते. मेडिकल, सुपरमधील सर्व ऑपरेशन थिएटर बंद आहेत.

Nagpur Medical | नागपुरात मेयो, मेडिकलची आरोग्यसेवा कोलमडली, परिचारिकांच्या संपाचा पाचवा दिवस, रुग्णांच्या शस्त्रक्रियांना थांबा
नागपुरात मेयो, मेडिकलची आरोग्यसेवा कोलमडली
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 11:26 AM

नागपूर : परिचारिकांच्या संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. या संपामुळे नागपुरातील मेयो आणि मेडिकलमधील आरोग्य सेवा कोलमडलीय. एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढलीय. तर दुसरीकडे परिचारिकांचा संप सुरू आहे. परिचारिकांचे आऊटसोर्सिंग (Outsourcing) करू नका, कायमस्वरूपी भरती करा, केंद्र सरकारप्रमाणे समान वेतन द्या, या मुख्य मागण्यांसाठी राज्य परिचारिका संघटनेचा (Nursing Association) संप पुकारलाय. या संपामुळे नागपूर मेडिकल आणि मेयो रुग्णालयात येणाऱ्या हजारो रुग्णांना फटका बसलाय. रास्त मागण्यांसाठी परिचारिकांकडून संप पुकारण्यात आलाय. त्यामुळे त्या मागण्या मान्य करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. असे सांगत डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालय तसेच प्रादेशिक मनोरुग्णालयातील परिचारिकांनी सुपर (Super), मेयो, मेडिकलमध्ये सुरू असलेल्या परिचारिकांच्या संपाला पाठिंबा दिलाय.

शस्त्रक्रिया थांबल्या

राज्य शासनाकडे आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून शनिवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले. प्रशासनाकडून रुग्णांचे हाल होत आहेत. अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षकांचे कार्यालय कुलूपबंद आहे. कोलमडलेली रुग्णसेवा सुधारण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून येते. मेडिकल, सुपरमधील सर्व ऑपरेशन थिएटर बंद आहेत. काल सकाळी मेडिकलमध्ये एकही शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती आहे. केवळ ट्रॉमा केअर युनिटमध्ये एक इर्मजन्सी शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती आहे.

बहुसंख्य परिचारिका संपात सहभागी

मेडिकलमध्ये सुमारे एक हजार परिचारिका आहेत. यापैकी संपादरम्यान सकाळी फक्त सोळा परिचारिका कर्तव्यावर हजर होत्या. 984 परिचारिका संपात सहभागी होत्या. मेडिकलमध्ये दुसर्‍या पाळीत केवळ सात परिचारिकांची उपस्थिती होती. मेयो रुग्णालयातही हीच स्थिती होती. सुपर स्पेशालिटीमध्ये 100 पैकी 7 परिचारिका रुग्णसेवेत हजर होत्या. यामुळे मेडिकलमध्ये असलेले 52 वॉर्ड परिचारिकांशिवाय आहेत. कॅज्युल्टीतदेखील एकही परिचारिका नसल्यामुळे रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागले.

हे सुद्धा वाचा

प्राध्यापकांच्या उन्हाळी सुट्या रद्द

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक तसेच परिचर्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांच्या उन्हाळी सुट्या रद्द केल्या आहेत. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचेही निर्देश दिलेत. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त असणार्‍या परिचर्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अध्यापकांना त्वरित कर्तव्यावर रुजू होण्याच्या सूचना केल्या आहेत.

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.