आमदार राजू पारवेंची दिवाळी मेंढा गावात : कोरोनात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दिला आधार

कुही तालुक्यातील मेंढा गावातील गोविंदा निकेश्वर यांचा एप्रिल 2021 मध्ये कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी निकेश्वर यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.

आमदार राजू पारवेंची दिवाळी मेंढा गावात : कोरोनात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दिला आधार
आमदार राजू पारवे
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 2:36 PM

नागपूर ः कुही तालुक्यातील मेंढा गावातील गोविंदा निकेश्वर यांचा एप्रिल 2021 मध्ये कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी निकेश्वर यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.

राजू पारवे यांनी घेतले पालकत्व

गोविंदा यांच्या कुटुंबात त्यांची 70 वर्षीय आई सायंत्राबाई राहते. पत्नी साधना यांना वयाच्या 33 व्या वर्षी अकाली वैधव्य आलं. मुलगा आदित्य (वय 13 वर्षे) आणि मुलगी (वय 11 वर्षे) हे पोरके झाले. शिवाय कल्पना (वय 40 वर्षे) या त्यांच्या मतिमंद बहीण आहेत. या सर्वांचा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांनी कोविड मध्ये मृत्यू झालेल्या परिवाराचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यामुळं पारवे यांनी दिवाळीला मेंढा येथील गोविंदा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. निकेश्वर कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.

सायंत्राबाईंनी अश्रू आवरेना

घरातील कर्ती पुरुष तसेच मुलगा गेल्याने सायंत्राबाई दुःखी आहेत. मुलाऐवजी मला का घेऊन गेला नाही देव, असं विचारत होत्या. गेल्या वर्षीची दिवाळी सायंत्राबाईना आठवत होती. अचानक आमदार पारवे घरी आल्यानं त्यांना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पारवे यांनी एक मुलगा गेला असला तरी दुसरा मुलगा जिवंत आहे, असा धीर दिला. सर्वांसाठी नवीन कपडे आणले. फटाकेही घेऊन आले होते. शिवाय आमदारांनी निकेश्वर कुटुंबीयांकडे जेवण घेतले. तसेच आर्थिक मदतही केली. त्यामुळं निकेश्वर कुटुंबीयांना यंदा दिवाळीचा आनंद लुटता आला. यावेळी सुनील किंदरले, राजू कुकळे, राजू कुथे व गावकरी उपस्थित होते.

कोरोनाने घेतला होता गोविंदा यांचा बळी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बरेच जण दगावले. त्यापैकी एक म्हणजे मेंढा येथील गोविंदा निकेश्वर. 18 एप्रिल 2021 रोजी गोविंदा यांचा ब्रम्हपुरीच्या बसस्थानकावरच मृत्यू झाला. कोरोना झाल्यानंतर ते ब्रम्हपरीला उपचारासाठी गेले होते. परंतु, बेड मिळाल्यानं रात्री ते बसस्थानकावरच थांबले होते. शेवटी उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. गोविंदा हे कुटुंबातील कर्ता पुरुष होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले.

इतर संबंधित बातम्या

Bhai Dooj 2021 | बहीण-भावाच्या नात्याचा मोठा उत्सव, जाणून घ्या भाऊबीजेबद्दल

प्रियांकासोबत निक जोनासचं खास दिवाळी सेलिब्रेशन, लक्ष्मीपूजनाला नवरा-बायको साथ-साथ!

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.