AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोटीस झुगारली, वीज कर्मचाऱ्यांचा आधी ‘शॉक’ नंतर ‘निदर्शने’; संपावर गेलेले वीज कर्मचारी एकवटले

साताऱ्यातही वीज कर्मचारी महावितरणच्या कार्यालयाबाहेर जमले असून त्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. मुंबईत वांद्रे येथील प्रकाशगड येथेही वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे.

नोटीस झुगारली, वीज कर्मचाऱ्यांचा आधी 'शॉक' नंतर 'निदर्शने'; संपावर गेलेले वीज कर्मचारी एकवटले
नोटीस झुगारली, वीज कर्मचाऱ्यांचा आधी 'शॉक' नंतर 'निदर्शने'Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 04, 2023 | 8:58 AM
Share

नागपूर: महावितरणच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ आजपासून वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. तीन दिवस हे कर्मचारी संपावर असणार आहेत. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच वीज कर्मचारी संपावर गेले. त्यामुळे राज्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज कर्मचाऱ्यांनी आधी संपावर जाण्याचा शॉक दिल्यानंतर आता नागपूरच्या कोराडी वीज केंद्राबाहेर जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.

महावितरणच्या खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. त्यामुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. वीज कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. संप पुकारल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, सरकारच्या नोटिशींना झुगारून वीज कर्मचारी संपावर गेले आहे.

आज सकाळीच वीज कर्मचारी नागपूरच्या कोराडी औष्णिक वीज केंद्रावर जमले. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही संप मागे घेणार नाही. सरकारनेच आपला प्रस्ताव मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी वीज कर्मचारी करत आहेत.

साताऱ्यातही वीज कर्मचारी महावितरणच्या कार्यालयाबाहेर जमले असून त्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. मुंबईत वांद्रे येथील प्रकाशगड येथेही वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे.

दरम्यान, वीज कर्माचऱ्यांनी संप पुकारल्याने राज्यात अनेक भागात अंधार पसरला. काही ठिकाणी मध्यरात्री 1 वाजल्यापासून ते काही ठिकाणी रात्री 3 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. पाच तास झाले तरी वीज सुरू न झाल्याने लोक संतापले आहेत.

वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका बसला आहे. संपामुळे 210 मेगावॅट क्षमतेचे युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट 5 पडले बंद आहे. युनिट 4 मध्ये एअर हीटरची समस्या उद्भवली आहे.

तर युनिट 5 मध्ये कोळश्याची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आल्याने दोन्ही युनिट कऱण्यात बंद करण्यात आले आहेत. चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील 2500 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सध्या कंत्राटी कामगारांवर महावितरणची सर्व भिस्त आहे.

गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात बत्ती गुल झाली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

कराडच्या कोयनानगर येथील वीज निर्मिती पावर हाउसमधील 36 मेगावॅटची दोन युनिट बंद झाली आहेत. कर्मचाऱ्यांविना युनिट झाले आहेत. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका वीज निर्मितीवर झाला आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वीज निर्मिती थांबली आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...