नागपूरमध्ये डेंग्यूचा एक रुग्ण आढळल्यास त्याच्या आसपासच्या 500 घरांचे सर्वेक्षण; पालिका आयुक्तांचे निर्देश

डेंग्यूची साथ रोखण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. नागपूरमध्ये एक डेंग्यू रुग्ण आढळल्यास आता त्याच्या आसपासच्या 500 घरांचे सर्वेक्षण होणार आहे. (nagpur city facing dengue outbreak administration ordered to take precautions)

नागपूरमध्ये डेंग्यूचा एक रुग्ण आढळल्यास त्याच्या आसपासच्या 500 घरांचे सर्वेक्षण; पालिका आयुक्तांचे निर्देश
dengue
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 10:30 AM

नागपूर: डेंग्यूची साथ रोखण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. नागपूरमध्ये एक डेंग्यू रुग्ण आढळल्यास आता त्याच्या आसपासच्या 500 घरांचे सर्वेक्षण होणार आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी तसे निर्देशच दिले आहेत. (nagpur city facing dengue outbreak administration ordered to take precautions)

डेंग्यू नियंत्रणासाठी नागपूर महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. नागपूर शहरात डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात डेंग्यू नियंत्रण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक झोनमध्ये डेंग्यू रुग्णांच्या घराजवळील 500 घरांचे सर्वेक्षण करा, असे सक्त निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. तसेच डेंग्यू नियंत्रणासाठी दररोज आढावा घेण्याचेही निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

1571 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या

नागपूरमध्ये 1 जुलै ते 13 जुलैपर्यंत डेंग्यूचे 82 रुग्ण मिळाले आहेत. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व झोन मिळून जून महिन्यात 66903 घरांची तपासणी केली आहे. त्यामध्ये एकूण 1571 घरांमध्ये डेंग्यूची अळी मिळाली आहे. मनपा कर्मचाऱ्यांना तपासणी दरम्यान सर्व झोन मिळून जूनमध्ये एकूण 1,43,079 डासोत्पत्ती स्थाने मिळाले. यामधून 85428 डासोत्पत्ती स्थानावर कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे पालिका प्रशासानाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.

एक दिवस कोरडा पाळणार

नागपूर शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हादरलं होतं. आरोग्य विभागाच्या मोठ्या प्रयत्नानंतर आता कोरोनाचे रुग्ण येथे कमी झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी येथे सध्यातरी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. असे असताना आता नागपूरकरांवर नवीन संकट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाळ्यामुळे येथे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य विषयक तज्ज्ञांनी तसा इशारा दिला आहे. याच कारणामुळे प्रशासनाने येथील नागरिकांना आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन केले आहे.

कचऱ्यामुळे मच्छर वाढले

पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात उद्भवतात. डेंग्यू तसेच इतर आजार डोकं वर काढतात. सध्या अनियमित पाऊस असल्याने असे रोग होण्याची शक्यता जास्त आहे. नागपुरात कधी पाऊस येतो तर कधी ऊन्हं पडतं. उकाडा वाढल्यामुळे येथील नागरिकांनी अजूनही घरातील कुलर काढलेले नाहीत. त्यातही सध्याच्या अनियमित पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत. या डबक्यांमध्ये कचरा कुजतो. परिणामी मच्छरांचे प्रमाणही वाढते. याच कारणामुळे आता प्रशासनाने यावर नियंत्रण आणण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. (nagpur city facing dengue outbreak administration ordered to take precautions)

संबंधित बातम्या:

कोरोना सरला, आता डेंग्यूचं नवं संकट, आठवड्यात एक कोरडा दिवस पाळण्याचे नागपूरकरांना आवाहन

महापालिकेचा भलताच थाट, महापौरांसाठी 11 लाखांची गाडी, 1111 नंबरसाठी 70 हजार रुपये खर्च

‘कुणी लसीचा दुसरा डोस देतं का रे?’, नागपुरात आज पुन्हा लसीकरण बंद, लसीसाठी जेष्ठ नागरिकांची भटकंती

(nagpur city facing dengue outbreak administration ordered to take precautions)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.