‘कुणी लसीचा दुसरा डोस देतं का रे?’, नागपुरात आज पुन्हा लसीकरण बंद, लसीसाठी जेष्ठ नागरिकांची भटकंती

लसीकरणाच्या या खेळखंडोब्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हाल सुरु आहे… त्यामुळे लसीचा तुटवडा आहे हे मान्य असलं, तरीही योग्य नियोजन करुण ज्येष्ठ नागरीकांचं लसीकरण करावं, अशी सामान्य अपेक्षा नागपूरकर व्यक्त करत आहेत.

'कुणी लसीचा दुसरा डोस देतं का रे?', नागपुरात आज पुन्हा लसीकरण बंद, लसीसाठी जेष्ठ नागरिकांची भटकंती
कोरोना लसीकरण

नागपूर : नागपुरात आज पुन्हा लसीकरण बंद… तसं यात आता नाविन्य काहीहीच नाही. कारण कोव्हिशिल्ड लसीचा साठा नसल्याने लसीकरण बंद, हे आता नेहमीचंच झालंय. पण यामुळे ज्येष्ठ नागरीकांना होणारा त्रास राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचावा, म्हणून आम्ही नागपुरात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची भटकंती दाखवतोय. (Nagpur Corona Vaccine Update Vaccine Shortage)

लसीसाठी जेष्ठ नागरिकांची भटकंती

69 वर्षांचे किशोर नेवारे सात ते आठ किमी सायकलवरुन लसीकरण केंद्रावर येतात. पण ‘आज लसीकरण बंद’ हा बोर्ड वाचून त्यांना परत जावं लागतंय, या वयात ते चार वेळा लसीकरण केंद्रांवर आलेय. पण लस नसल्यामुळे त्यांना कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस मिळाला नाही.

लसीकरणासाठी इकडून तिकडे भटकंती करणारे किशोर नेवारे एकटेच नाहीत, तर लसीकरणाच्या या खेळखंडोब्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हाल सुरु आहे… त्यामुळे लसीचा तुटवडा आहे हे मान्य असलं, तरिही योग्य नियोजन करुण ज्येष्ठ नागरीकांचं लसीकरण करावं, अशी सामान्य अपेक्षा नागपूरमधले सगळेच नागरिक करु लागले आहेत.

ज्येष्ठांना मनस्ताप

शहरात असे खूप ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलाय जे दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आणि महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे ज्येष्ठांना दोन चार किलोमीटर पायपीट करुनही लस मिळत नसल्याने जेष्ठांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

लसीचा अपुरा पुरवठा

राज्यात कोरोना लसीकरणाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिमेनेही चांगलाच वेग धरला आहे. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. परंतु लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणात अडथळा निर्माण होऊन खंड पडतो आहे.

(Nagpur Corona Vaccine Update Vaccine Shortage)

हे ही वाचा :

Nagpur Vaccination | लशीच्या पुरवठ्याअभावी नागपुरात आजही 18 वर्षावरील वयोगटाचं लसीकरण नाही

नागपुरात कोरोना लसीकरणाला तुफान प्रतिसाद, एकाच दिवसात तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI