AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात कोरोना लसीकरणाला तुफान प्रतिसाद, एकाच दिवसात तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. नागपुरात एकाच दिवस तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. (Nagpur Record 42,000 people have been Corona vaccinated)

नागपुरात कोरोना लसीकरणाला तुफान प्रतिसाद, एकाच दिवसात तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोना लसीकरण
| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 9:08 AM
Share

नागपूर : राज्यात कोरोना लसीकरणाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिमेनेही चांगलाच वेग धरला आहे. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. नागपुरात एकाच दिवस तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेच नागपुरात लसीकरणाचा विक्रम पाहायला मिळत आहे. (Nagpur Record 42,000 people have been Corona vaccinated in the district on the same day)

नागपुरात लसीकरणाला तुफान प्रतिसाद

गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नागपुरात कालपासून 18 वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यानंतर काल एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 41 हजार 881 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत हा सर्वाधिक आकडा आहे. विशेष म्हणजे फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काल 18 हजार 18 नागरिकांनी लस घेतली. तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 22 हजार 221 नागरिकांनी लस घेतली आहे.

राज्यात 6 लाख 2 हजार 163 नागरिकांना लस

दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद केली आहे. राज्यात काल दिवसभरात 6 लाख 2 हजार 163 नागरिकांना लस देण्यात आली. तर 22 जूनला एकाच दिवशी 5 लाख 52 हजार 909 जणांचे लसीकरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लस देणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

पुणे शहरातही विक्रमी लसीकरण

पुणे शहर जिल्ह्यात काल दिवसभरात 623 केंद्रावर आतापर्यंतचे विक्रमी लसीकरण झाल्याची ‘को विन’ पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात तब्बल 90 हजार 530 जणांचे लसीकरण करण्यात आले. तसेच काही दिवसांपूर्वी पुण्यात 85 हजारापर्यंत लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे  येत्या काही दिवसात पुणेकर एक लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

(Nagpur Record 42,000 people have been Corona vaccinated in the district on the same day)

संबंधित बातम्या :

Nagpur Vaccination | लशीच्या पुरवठ्याअभावी नागपुरात आजही 18 वर्षावरील वयोगटाचं लसीकरण नाही

Nagpur Unlock: नागपूरकरांना मोठा दिलासा, दुकाने रात्री 8 पर्यंत सुरु राहणार, नव्या आदेशाची 21 जूनपासून अंमलबजावणी

नागपूरकरांनी करुन दाखवलं; 130 दिवसानंतर जिल्ह्यात एकही कोरोनाबळी नाही

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.