Nagpur Campaign : नागपूर शहर उजळून निघणार स्वातंत्र्याच्या तिरंगी रोषणाईत, मनपा कार्यालये, चौक, रस्ते, प्रमुख स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई

सोशल मीडियाचे सर्व हँडल व्हाट्सॲप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्रामसह अन्य ठिकाणी भारतीय तिरंग्याची फोटो ठेवण्याबाबत राज्य शासनाकडून दिशानिर्देश जारी करण्यात आलेले आहेत.

Nagpur Campaign : नागपूर शहर उजळून निघणार स्वातंत्र्याच्या तिरंगी रोषणाईत, मनपा कार्यालये, चौक, रस्ते, प्रमुख स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई
नागपूर शहर उजळून निघणार स्वातंत्र्याच्या तिरंगी रोषणाईत
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 05, 2022 | 10:10 PM

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत नागपूर शहरामध्ये ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tricolor) मोहीम उत्साहात राबविण्यात येणार आहे. यादृष्टीने नागपूर महापालिकेची तयारी अंतिम टप्प्यात येत आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जावा, यासाठी मनपाद्वारे नागरिकांना अत्यंत कमी दरात तिरंगा उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय संपूर्ण शहरामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर व्हावा, देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे. मनपा मुख्यालयातील इमारती, नगर भवन, झोन कार्यालय यासह शहरातील शहिद स्मारक, महत्वाचे चौक, कविवर्य सुरेश भट सभागृह (Suresh Bhat Auditorium), रा.पै. समर्थ चिटणीस पार्क स्टेडियम आणि यशवंत स्टेडियमसह दोन विशेष मार्गांवर तिरंगी रोषणाई (Electric Lighting) केली जाणार आहे. तसेच महत्वाच्या चौकातसुध्दा तिरंगी रोषणाई केली जाणार आहे. एकूणच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या तिरंगी रोषणाईत संपूर्ण नागपूर शहर उजळून निघणार आहे. मनपाद्वारे नागरिकांना कमीत कमी दरात ध्वज उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले. मनपा मुख्यालयासह दहाही झोन कार्यालयामध्ये अवघ्या 14 आणि 26 रुपयांमध्ये ध्वज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

75 चौकांमध्ये आकर्षक तिरंगी रोषणाई

नागपूर शहरात अनेक ठिकाणी शहिदांचे स्मारक, पुतळे आहेत. शहरातील अनेक चौकांना स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आहे. शहरातील 75 महत्वाचे व ऐतिहासिक चौकांमध्ये आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात यावी. यासाठी चौक, स्मारकांची स्वच्छता, रंगरंगोटी, परिसराची स्वच्छता करणे आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचीही सूचना आयुक्तांनी केली. याशिवाय ढोल ताशा पथकाचाही सहभाग घेण्याची त्यांनी सूचना केली.

दोन मार्गांवर तिरंगी विद्युत खांब

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील दोन महत्वाच्या मार्गांवरील विद्युत खांबांवर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सिव्हिल लाईन्स येथील संविधान चौक ते लेडीज क्लब चौक आणि शंकर नगर ते जापानी उद्यान चौक या दोन मार्गावरील विद्युत खांब तिरंगी रोषणाईने उजळून निघणार आहे. याशिवाय शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृह, रा. पै. समर्थ चिटणीस पार्क स्टेडियम आणि यशवंत स्टेडियमवर ढोल ताशा पथकाचे सादरीकरण आणि विद्युत रोषणाई केली जाईल.

प्रोफाईलवर तिरंगा ठेवा

सोशल मीडियाचे सर्व हँडल व्हाट्सॲप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्रामसह अन्य ठिकाणी भारतीय तिरंग्याची फोटो ठेवण्याबाबत राज्य शासनाकडून दिशानिर्देश जारी करण्यात आलेले आहेत. त्यानुसार मनपातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागपूर शहरातील सर्व नागरिकांनी स्वत:च्या सोशल मीडियावर तिरंग्याचे प्रोफाईल फोटो लावण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें