‘नागरिकांकडून कर स्वरुपात हजारो कोटी उकळले’, मनपा आयुक्तांवर कारवाई करा, नागपूर काँग्रेसची मागणी

मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांच्यावर काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत. राधाकृष्ण बी यांनी कर स्वरुपात कोट्यवधी रुपये जनतेकडून वसूल केले आहेत, असं काँग्रेसने म्हटलंय.

'नागरिकांकडून कर स्वरुपात हजारो कोटी उकळले', मनपा आयुक्तांवर कारवाई करा, नागपूर काँग्रेसची मागणी
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 7:26 PM

नागपूर : मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांच्यावर काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत. राधाकृष्ण बी यांनी जनतेकडून कर स्वरुपात कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत, असं काँग्रेसने म्हटलंय. तसेच नागरिकांची फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीदेखील नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली. पोलीस आयुक्तांकडे त्यांनी ही मागणी केलीय. (Nagpur Congress alleged that Municipal Commissioner Radhakrishnan B collected illegal tax from citizens demand action)

फसवणुकीने कर स्वरुपात कोट्यवधी रुपये वसूल केले

मागील अनेक दिवसांपासून नागपूरमधील राजकारण तापले आहे. नागपूर मनपा तर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या नागपूरचे मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांच्यावर नागपूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी मागील अनेक दिवसांपासून जनतेकडून फसवणुकीने कर स्वरुपात कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत, असा आरोप विकास ठाकरे यांनी केलाय. तसेच जनतेकडून वसूल केलेले हजारो कोटी रुपये परत करावेत अशी मागणीदेखील ठाकरे यांनी केली आहे.

कारवाई करण्याची नागपूर काँग्रेसची मागणी

याच मुद्द्याला घेऊन विकास ठाकरे यांनी पोलीस आयुक्त तसेच राज्य सरकारकडे राधाकृष्ण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, ठाकरे यांच्या या आरोपानंतर नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मनपा आयुक्तांवर सरकारचा दबाव, 550 कोटींच्या फाईल्स प्रलंबित – भाजप

तर दुसरीकडे मनपा आयुक्तांवर महाविकास आघाडीचा दबाव आहे, असा आरोप नागपूर भाजपने केला होता. याच कारणामुळे अजूनही 550 कोटींच्या फाईल्स प्रलंबित आहेत, असा गंभीर आरोप भाजपने तीन सप्टेंबर रोजी भाजपने केला होता. “नागपूर मनपात भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडी सरकार निधीवाटपात भेदभाव करत आहे. मुद्दामहून नागपूर मनपाला निधी दिला जात नाही. नागपूर आयुक्तांकडे विविध विकासकामांच्या तब्बल 550 कोटी रुपयांच्या कामाच्या फाईल्स प्रलंबित आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचा आयुक्तांवर दबाव असल्यामुळे ते या फाईली मंजूर करत नाहीत,” असा आरोप भाजप नेते अविनाश ठाकरे यांनी केला होता. तसेच आयुक्तांनी फाईल्स मंजूर लवकरात लवकर कराव्यात. अन्यथा आगामी काळात आम्ही रस्त्यावर उतरुन संघर्ष करु, असा इशाराही अविनाश ठाकरे यांनी दिला होता.

इतर बातम्या :

नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, अकोलामध्ये बांधकाम परवानगी आता ऑफलाइन

महाविकासआघाडी सरकार आणि महावितरण मुघलांसारखं वागतंय, शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा, चंद्रशेखर बावनकुळेंचा आंदोलनाचा इशारा

नागपूर ZP पोटनिवडणूक : महाविकास आघाडी तुटल्यात जमा, शिवसेनेचे सर्व जागांवर उमेदवार

(Nagpur Congress alleged that Municipal Commissioner Radhakrishnan B collected illegal tax from citizens demand action)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.