नागपूर मनपा आयुक्तांवर महाविकास आघाडीचा दबाव, अजूनही 550 कोटींच्या फाईल्स प्रलंबित, भाजपचा गंभीर आरोप

नागपूर मनपा आयुक्तांकडे विविध विकास कामांच्या तब्बल 550 कोटी रुपयांच्या फाईल्स प्रलंबित असल्याचा दावा भाजपने केला आहे. महाविकास आघाडीचा मनपा आयुक्तांवर दबाव आहे. त्यामुळे आयुक्त फाईल्स मंजूर करत नाहीत असा आरोप भाजप नेते अविनाश ठाकरे यांनी केलाय.

नागपूर मनपा आयुक्तांवर महाविकास आघाडीचा दबाव, अजूनही 550 कोटींच्या फाईल्स प्रलंबित, भाजपचा गंभीर आरोप
NAGPUR MUNICIPAL COMMISSIONER

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेनं ‘फाइल ट्रॅकर’च्या माध्यमातून सरकारी कामे जलद गतीने होण्यासाठी प्रयत्न केलेला असताना आता नगापूर महानगरपालिकच्या कारभारासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. नागपूर मनपा आयुक्तांकडे विविध विकास कामांच्या तब्बल 550 कोटी रुपयांच्या फाईल्स प्रलंबित असल्याचा दावा भाजपने केला आहे. महाविकास आघाडीचा मनपा आयुक्तांवर दबाव आहे. त्यामुळे आयुक्त फाईल्स मंजूर करत नाहीत असा आरोप भाजप नेते अविनाश ठाकरे यांनी केलाय. (rupees 550 crore files are pending Nagpur Municipal Commissioner is not signing nagpur bjp alleges)

आयुक्तांवर महाविकास आघाडीचा दबाव, त्यामुळेच फाईल्स मंजूर करत नाहीत 

नागपूर मनपात भाजपची सत्ता असल्याने, महाविकास आघाडी सरकार निधीवाटपात भेदभाव करत आहे. मुद्दामहून नागपूर मनपाला निधी दिला जात नाही. नागपूर आयुक्तांकडे विविध विकासकामांच्या तब्बल 550 कोटी रुपयांच्या कामाच्या फाईल्स प्रलंबित आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचा आयुक्तांवर दबाव असल्यामुळे ते या फाईली मंजूर करत नाहीत, असा आरोप ठाकरे यांनी केलाय. तसेच आयुक्तांनी फाईल्स मंजूर लवकरात लवकर कराव्यात. अन्यथा आगामी काळात आम्ही रस्त्यावर उतरुन संघर्ष करु, असा इशाराही अविनाश ठाकरे यांनी दिलाय.

कामे लवकर मार्गी लागण्यासाठी ‘फाइल ट्रॅकर’

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटलं जातं. ग्रामीण भागाशी संबंधित शासनाचे जवळपास सर्वच विभाग याठिकाणी कार्यरत आहेत. रोज शेकडा नागरिक कामासाठी येतात. शिवाय कर्मचाऱ्यांशी संबंधित फाईलही असतात. अनेकदा चिरीमिरीसाठी फाईल्स दाबून ठेवल्या जातात. विशेषतः पंचायत स्तरावरील अधिकारी, कर्मचारी फाईल मुख्यालयात पाठविल्याचे सांगून वेळ मारून नेतात. प्रत्यक्षात फाईल मुख्यालयात येतच नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. यावर नागपूर जिल्हा परिषदेनं ‘फाइल ट्रॅकर’च्या माध्यमातून तोडगा काढलाय. यामुळं फाईल्स कुठं आणि का आडल्या आहे, याची माहिती मिळेल. परिणामी कामं लवकर मार्गी लागतील आणि भ्रष्टाचारावर अंकुश बसेल. ही प्रणाली लावणारी नागपूर जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरली आहे.

फाईल ट्रॅकरचं काम कसं होणार?

या प्रकारावर आळा घालण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर यांनी फाईलला ट्रॅकर लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता फाइल एका विभागात किती वेळ राहिली याची माहिती मिळते. प्रत्येक फाइलला बार कोड लावण्यात आलाय. ट्रॅकरच्या माध्यमातून बार कोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभागात होईल. त्यानंतर दुसऱ्या विभागात फाईल पाठविताना जावक विभागात त्याची नोंद होईल. यामुळे फाइल किती दिवस संबंधित विभागात राहिली त्याची नोंद राहील, अशी माहिती फाईल ट्रॅकरचे सॉफ्टवेअर डेव्हलपर प्रतिक मेश्राम यांनी दिली.

इतर बातम्या :

बसमध्ये पहिली भेट, ओळखीचं प्रेमात रुपांतर, लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध, नंतर प्रियकर फरार

TV9 Impact : नागपुरातील कृषी साहित्य वाटपातील भ्रष्टाचाराची चौकशी होणार, कृषी विभागाकडून आदेश

तो मध्यप्रदेशातून नागपुरात यायचा, काही दिवस मुक्काम ठोकायचा, नंतर संधी साधून जे करायचा ते ऐकून पोलीसही चक्रावले

(rupees 550 crore files are pending Nagpur Municipal Commissioner is not signing nagpur bjp alleges)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI