‘त्या’ दिवशी महाराष्ट्रातील सरकार पडेल…; नाना पटोले यांचं सर्वात मोठं विधान

Congress Leader Nana Patole on Maharashtra Politics : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. लवकरत सरकार पडणार आहे, असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर......

'त्या' दिवशी महाराष्ट्रातील सरकार पडेल...; नाना पटोले यांचं सर्वात मोठं विधान
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 5:46 PM

निवडणुकीच्या तोंडावर काही गोष्टी अंगावर येऊ नये. म्हणून मराठा आरक्षणासंदर्भात सत्तेचा उपयोग करत पोलीस रिपोर्ट अशा पद्धतीचा आणला गेला. निवडणुकीच्या तोंडावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना सहा सात महिन्यापूर्वीची असताना निवडणुकीच्या तोंडावर हा विषय काढला हे संशयास्पद आहे. विधानसभेचे अधिवेशन होऊ घातलं होत ते होणार की नाही होणार? कारण 4 जूनला निकाल आल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार पडेल. पण या प्रश्नाची फेर तपासणी व्हावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करत आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

पटोलेंचे भाजपवर गंभीर आरोप

भाजप निवडणूक हरत असल्यामुळे बूथ कॅपचर चे प्रमाण देशात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भाजपच्या नेत्याच्या पोरांनी गुजरातमध्ये सरकार असल्यामुळे बूथ कॅप्चरिंग करून स्वतः इन्स्टाग्रामवर टाकलं. लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम भाजप करत आहे. निवडणूक आयोगाने तात्काळ याची दखल घ्यावी. अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे, असं नाना पटोलेंनी सांगितलं.

नाना पटोलेंचं आश्वासन काय?

देशातील वातावरण राहुल गांधींच्या नेतृत्वात गॅरेंटी वॉरंटी सहित दिली आहे. भाजप विरोधात प्रचंड चीड लोकांमध्ये आहे. बदलाचे वारे देशभरामध्ये सध्या पाहायला मिळत आहे. आज जगात भारत हा युवकांचा देश म्हणून नावलौकिक आहे. बेरोजगार करण्याचा पाप नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने केलं. त्यामुळे युवकांना न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेसची प्राथमिकता असणार आहे. अग्नि योजना बंद करून रेगुलर मिल्ट्रीची भरती करून देशातील तरुण आणि तरुणींना लढण्याचा आणि संधी देण्याचे काम काँग्रेस करणार आहोत. पेपर लीक होण्याचा जे प्रमाण आहे, त्याला रोखण्यासाठी जन्मठेप करण्याची शिक्षा कायद्याचं रूपांतर करून आमच्या सरकार आल्यावर करू, असं म्हणत पटोलेंनी लोकांना आश्वस्त केलं.

महाराष्ट्रात 108 नंबरची ॲम्बुलन्स रुग्णांसाठी चालवली जाते. याची सुरुवात काँग्रेसने केली होती. त्याला एक्सटेन्शन देण्यासाठी दहा हजार कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने केलेला आहे. सामान्य रुग्णांना वेळेवर उपचार मिळू नये आणि ते तडफडत मरावे. ब्लॅक लिस्ट कंपन्यांना सरकारने काम दिलं आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

Non Stop LIVE Update
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....