पवारसाहेबांच्या अंगावरून साप गेला अन् 8 दिवसात…; सुप्रिया सुळेंनी सांगितली जुनी आठवण

Supriya Sule on Sharad Pawar : सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यासोबत घडलेला एक जुना किस्सा सांगितला. अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी आज त्या शिरूरमध्ये आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं, तेव्हा शिरूरकरांना सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय आवाहन केलं? वाचा सविस्तर...

पवारसाहेबांच्या अंगावरून साप गेला अन् 8 दिवसात...; सुप्रिया सुळेंनी सांगितली जुनी आठवण
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 5:32 PM

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे शिरूरमध्ये आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे शिरूरमध्ये आहेत. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मंचर म्हटलं की एकच नाव लक्षात येत ते म्हणजे कै.दत्तू पाटील वळसे पाटील…या तालुक्याच नातं पवारसाहेब आणि वळसे यांचं नातं घनिष्ठ होतं. माझी आई आणि मी नेहमी भीमाशंकर ला दर्शनासाठी जात असतो. 1995 साली डिंभे इथं मुक्काम केला. तेव्हा पवार साहेबांच्या अंगावरून साप गेला. तेव्हा दत्तू पाटील म्हणाले शुभ संकेत आहेत. त्यानंतर 8 दिवसात सरकार बनलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देशाचे कृषीमंत्री कोण आहेत…? या देशात कशालाच भाव नाही. मग भाव कशाला आहे? माझा पेपरवर आणि टीव्हीवर विश्वास आहे..अजूनही मी त्याच बातम्या पाहते. लोक म्हणतात शिवाजी आढळराव याच्या कंपनीचं काहीतरी आलंय. पण आपल्याला आपल्या अमोल दादा सारखा खासदार हवा… पक्ष फोडला ना यांनी मागितलं असतं तर सगळं दिलं असतं. नाती तोडणं सोपं पण जोडायला मला आवडते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या….

आपल्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण आता आपण मुक्त झालोय. पुत्र प्रेमाचा पण आरोप केला. इथली भाषण ऐकून मला नवल वाटतं. अमोल दादांची भाषणं ऐकून एकतर्फी मतदान झालं पाहिजे. कांद्याचा प्रश्न फक्त अमोल दादांनी मांडला. राज्यातील 38 खासदारांपैकी फक्त एकाने हा प्रश्न मांडला. अमोल दादा आणि माझं निलंबन झालं. कांद्याला हमी भावासाठी मागितला. म्हणून आम्ही कायम मांडणार फाशी झाली तरीही मांडणार आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अमोल कोल्हेंसाठी काय आवाहन?

मी नेहमी भीमाशंकर ला माझ्या आईला घेऊन येणार आहे. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यत असतो. मी रामकृष्ण हरी वाली आहे… माझा पांडुरंगावर विश्वास आहे. शिरुर ला मतं मागायला काही प्रॉब्लेम नाही. आपला उमेदवार एक नंबर आहे… अमोल हा माझ्या भावासारखा आहे. त्यामुळे तुम्ही लोकांनी त्याला साथ दिली पाहिजे, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.