त्याचा हिशोब करा…; पवारांनी संधी न दिल्याच्या अजितदादांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

Supriya Sule Criticized Ajit Pawar and Shirur Loksabha Election 2024 : शरद पवारांनी संधी न दिल्याच्या अजितदादांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकात पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरही सुप्रिया सुळेंनी टीका केली. वाचा सविस्तर...

त्याचा हिशोब करा...; पवारांनी संधी न दिल्याच्या अजितदादांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 2:56 PM

मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती… पण केवळ मी त्यांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही, असं विधान अजित पवार यांनी शिरूरमध्ये बोलताना केलं. त्यांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना… कोणाला काय मिळालं? याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि अजितदादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे. सगळं स्पष्ट होईल. खूप सोपं उत्तरं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

चंद्रकांत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटलांनी बारामतीत असं बोलायला नको होतं. मुळात हे वक्तव्य दीड महिन्यांपूर्वी केलं होतं. आम्हाला वेदना देणारं हे वक्तव्य आहे. शरद पवारांना संपवायचं आहे, असे शब्द चंद्रकांतदादांचे होते. ते असं का बोलले होते, हे आम्हाला समजलं नव्हतं. मात्र गेली महिनाभर यावर कोणी बोललं नाही. ही प्रवृत्ती वाईट आहे. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम केलं आहे. अशात संपवायची भाषा खूप धक्कादायक आणि दुर्दैवी होतं. लोकशाहीत असं चालत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाले.

चंद्रकांत पाटील केलेल्या विधानाला दीड महिना झालाय. ते विधान आम्हाला वेदना देणार होतं. चंद्रकांत पाटील अस काय म्हणतायत याच वाईट वाटलं. शरद पवारांना संपवायचं हे शब्द होते. यावर कोणीच काही बोलल नाही. शरद पवारांना संपवायची ही प्रवृत्ती धक्कादायक होती. लोकशाहीत संपवायची भाषा नसते. सत्तेतील नेते बारामतीत येऊन पवारांना संपवायची भाषा करतात हे दुर्दैवी आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.

अजित पवारांना प्रत्युत्तर

राजकारणात कोण कोणाचा कायम शत्रू नसतो, असं अजित पवार यांनी म्हटलं. यावर मी याबाबत काही ऐकलं नाही, त्याबाबत मी बोलू शकत नाही. चंद्रकांत दादांचे मी स्वतः ऐकले होते, म्हणून मी स्पष्ट बोलले. अजित पवारांचा स्वभाव तुम्हाला माहित आहे. दादाचं करिअर बघा आणि माझा करिअर बघा.मग तुम्हाला कळेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.