Nagpur corona : नागपूरची कोरोनामुक्तीच्या दिशेने घोडदौड, 9 दिवसात शून्य मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेची धाकधूक असताना, नागपूरकरांना सर्वात मोठा दिलासा (Nagpur corona) मिळाला आहे. कारण गेल्या 9 दिवसात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही.

Nagpur corona : नागपूरची कोरोनामुक्तीच्या दिशेने घोडदौड, 9 दिवसात शून्य मृत्यू
संग्रहित छायाचित्र.

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेची धाकधूक असताना, नागपूरकरांना सर्वात मोठा दिलासा (Nagpur corona) मिळाला आहे. कारण गेल्या 9 दिवसात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. इतकंच नाही तर रुग्णसंख्येत सुद्धा मोठी घट झाल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे राज्याची उपराजधानी नागपूरची कोरोनामुक्तीच्या दिशेने घोडदौड सुरु असल्याचं चित्र आहे.

नागपूरमध्ये दररोज कोरोनाच्या चाचण्या चार हजारांच्या वर होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने दिलासा मिळत आहे. मात्र यामुळे नागरिक बिनधास्त होऊन नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे नागपूरकरांना दुसऱ्या लाटेतून दिलासा मिळत असताना तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत तर नाही ना, याचं भान राखणं आवश्यक आहे.

रुग्णसंख्येत मोठी घट 

नागपूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे. सात दिवसांत जिल्ह्यात 10 च्या आत कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात शनिवारी एकही रुग्ण आढळला नाही तर रविवारी पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी 5070 चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये पाच जण पॅाझिटिव्ह आढळले होते.

दुसऱ्या लाटेत हाहाकार, तिसऱ्या लाटेसाठी तयारी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्हयात हाहाःकार उडाला होता. रुग्णांना नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळत नव्हती, त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दहा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 10 रुग्णवाहिका

पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते या 10 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 56 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यात आणखी दहा रुग्णवाहिकेची भर पडलीय. नवीन रुग्णवाहिका जिल्हा विकास निधी तसेच खनिज विकास निधी अंतर्गत देण्यात आल्याय.

संबंधित बातम्या 

‘नागपुरातील कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी, उद्धवजी, आता निर्बंध शिथील करा’; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नागपूर सज्ज, 2 लाख 14 हजार बालकांच्या मातांचे प्राधान्याने लसीकरण 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI