नागपुरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल, अचानक रुग्णवाढल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली

राज्याची उपराजधानी नागपूरमधून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या नागपूरमध्ये रुग्णसंख्या दोन आकड्यांमध्ये पोहोचलीय.

नागपुरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल, अचानक रुग्णवाढल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली
corona
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 10:35 AM

नागपूर: राज्याची उपराजधानी नागपूरमधून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या नागपूरमध्ये रुग्णसंख्या दोन आकड्यांमध्ये पोहोचलीय. नागपूरमध्ये एकाच दिवशी 18 रुग्ण समोर आल्यानं तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जातेय. नागपूरमधून कोरोना रुग्ण वाढण्यास सुरुवात झाल्यानं ती तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना कोरोना

नागपूरमध्ये सर्वात कमी रुग्णांची नोंद होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झालीय. मंगळवारी नागपुरात एकाच दिवशी 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लसीकरण झालेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील 12 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील चिंता वाढली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 12 विद्यार्थ्यांना कोरोना

नागपूरमधील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या 11 विद्यार्थ्यांना तर लता मंगेशकर मेडिकल कॉलेजच्या 1 विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्व विद्यार्थ्यांवर शालिनीताई मेघे रुग्णालयात उपचार सुरू, विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. संपर्कात आलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं वसतिगृहातच विलगीकरण करण्यात येणार आहे.

पन्नास विद्यार्थी विलगीकरणात

कोरोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कातील सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोमवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी तिसऱ्या लाटेच्या पदार्पणाचे सूतोवाच केले होते. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तब्बल बारा विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच नागपुरात कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागपुरात दिवसभरात 18 कोरोना रुग्णांची नोंद

दरम्यान नागपुरात आज 18 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर आज एकाचाही मृत्यू झाला नाही. दिसभरात नऊ कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे नागपुरातील रुग्णसंख्या 4 लाख 82 हजार 906 वर पहोचली आहे. तर आतापर्यत एकूण 10 हजार 119 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढली

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 6 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात 37 हजार 875 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 369 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 37 हजार 875 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 369 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 114 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

इतर बातम्या:

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली, कोरोनाबळींतही वाढ सुरुच

Corona Cases In India | देशात सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा चार लाखांखाली, मात्र कोरोनाबळींत वाढ

Nagpur Corona virus cases increased by 18 Health Department Alert to prevent hike of covid cases

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.