Nagpur Corona : पालिकेचे हेल्पलाईन नंबर बंद, नागपूरमध्ये बेड कुठे आणि कसा मिळणार, संपूर्ण माहिती

एखाद्याला लक्षणे असली किंवा तो कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असेल आणि त्याला टेस्ट करायची असेल तर नागपुरात विविध ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते.

Nagpur Corona : पालिकेचे हेल्पलाईन नंबर बंद, नागपूरमध्ये बेड कुठे आणि कसा मिळणार, संपूर्ण माहिती
serum institute
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 3:01 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाची भयावह (Nagpur corona) स्थिती आहे. जिल्ह्यात काल 3758 नवे रुग्ण आणि 54 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात सक्रीय रुग्णसंख्या 41 हजारांच्या वर गेली आहे. यात गरोदर महिलांचाही समावेश आहे.  उपचारासाठी खाजगी आणि सरकारी रुग्णालयात बेड मिळत नसल्याने, अनेक अडचणींचा समाना करावा लागतोय. यावर उपाय म्हणून शहरातील काही डॉक्टरांनी कोरोना रुग्णांसाठी ॲानलाईन ओपीडी सुरु केली आहे. शहरातील प्रसिद्ध स्रीरोग तज्ज्ञ डॅाक्टर सीमा दंदे यांनी कोरोनाबाधीत गरोदर महिलांसाठी ॲानलाईन ओपीडी सुरु केली आहे. (Nagpur covid19 corona cases, test, corona report, corona dashboard How to get covid bed in Nagpur all you need to know)

एखादा व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्यावर नेमकं काय करायचं असा प्रश्न त्याला पडतोय. ज्यांना प्रत्यक्ष डॅाक्टरकडे जाणे शक्य नाही, त्या कोरोनाबाधीतांना कोरोनाच्या ॲानलाईन ओपीडीचा चांगला फायदा होतोय. सध्या कोरोनाच्या संकटात याबाबत जनजागृती करत असल्याचं, सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी सांगितलं.

नागपूरमधील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक माहिती 

हेल्पलाईन नंबर लागतच नाहीत

नागपूर महापालिकेची वेबसाईट www.nmcnagpur.gov.in/covid-19 यावर कोरोनाबाबतची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या वेबसाईटवर कोरोना व्हायरसबाबतचा हेल्पलाईन क्रमांक :- 0712-2567021 / 0712-2551866 / 18002333764 दिले आहेत. मात्र हे तिन्ही नंबर लागतच नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कुठे संपर्क करायचा हा प्रश्न आहे.

नागपूरमध्ये कोरोना चाचणी कशी होते? (How to do corona test in Nagpur)

एखाद्याला लक्षणे असली किंवा तो कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असेल आणि त्याला टेस्ट करायची असेल तर नागपुरात विविध ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते.

नागपुरात टेस्ट करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी केंद्र उघडली आहेत.  त्या ठिकाणी RTPCR आणि अँटिजन टेस्ट केली जाते. जवळपास 200 केंद्रांवर ही टेस्ट होते. सोबतच खाजगी रुग्णालय ज्यांना कोव्हिड रुग्णालय जाहीर केलं आहे, तिथे काही खाजगी लॅबमध्ये सुद्धा टेस्ट केली जाते.

नागपुरात टेस्ट कशी होते, किती वेळ लागतो, रांगा आहेत का? (Nagpur que for corona test)

नागपुरात RTPCR आणि अँटिजन टेस्ट केली जात आहेत. टेस्टिंग सेंटर जास्त असल्याने फार रांगा नाही मात्र गर्दी असते

 टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी किती वेळ लागतो? तोपर्यंत रुग्णाने काय करायचं?

RTPCR टेस्टसाठी  1 ते 2 तास लागतात. या चाचणीचा रिपोर्ट 24 तासानंतर येतो. तर अँटिजन टेस्ट 20 मिनिटात होते, आणि या चाचणीचा रिपोर्टही 1 ते 2 तासात येतो.  टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत रुग्णाला विलगीकरणात राहायचं असते.

 एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर रुग्णाने कुठे जायचं? महापालिका त्याला घेऊन जाते की स्वत:ला जावं लागतं?

रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एकतर रुग्णाला लक्षणे कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहता येते.

लक्षणे जास्त असल्यास कोव्हिड केअर सेंटरला भरती करण्यात येते. सेंटरला रुग्ण स्वतः जाऊ शकतो किंवा माहिती दिल्यास महापालिका रुग्णवाहिका पाठविते.

 रुग्णांना कुठे पाठवलं जातं? कोव्हिड सेंटर किंवा तत्सम

ज्यांना खाजगी रुग्णालयात जायचं असेल ते तिकडे जाऊ शकतात किंवा मग कोव्हिड केअर सेंटर उभारले आहेत.

  रेमडेसिव्हीर मिळतं का? त्यांचे दर, रुग्णालयांची फी कशी आहे?

रेमडेसिव्हर आता मेडिकलमध्ये मिळणं बंद झालं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे इंजेक्शन आता केवळ रुग्णालयांना देण्याचा निर्णय़ घेतला आहे.

सरकारी रुग्णालयात फी लागत नाही. विनामूल्य उपचार होतात. मात्र खाजगी रुग्णालयाला प्रशासनाने आकारुन दिलेल्या फीनुसार चार्ज करावा लागतो.

नागपुरात कोरोनाची लागण झाल्यावरची प्रकिया

: कोरोनाचा रिपोर्ट पॅाझिटिव्ह आल्यावर संबंधीत लॅबकडून डेटा महानगरपालिकेकडे जाते

: मनपाच्या कॅाल सेंटरमधून फोन करुन रुग्णाला आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितलं जातं

: दुसऱ्या दिवशी मनपाची टीम घरी भेट देते, आयसेालेसन व्यवस्था पाहिली जाते आणि रुग्णाची प्रकृती तपासून औषध दिलं जातं

: घरी आयसेालेसनची सोय नसल्यास रुग्णाला मनपाच्या आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवलं जातं

: पाचपावली, आमदार निवास आणि व्हीएनआयटी सेंटरला आयसोलेशनची सोय आहे

: ज्या रुग्णाची प्रकृती जास्त गंभीर असेल त्यांना मनपाच्या रुग्णालयात जाण्यास सांगितलं जातं

: 0712 – 2567022 मनपाच्या या कॅाल सेंटरवरुन मनपाच्या रुग्णालयात बेडची माहिती दिली जाते

: मनपाकडून दुसऱ्या, पाचव्या आणि दहाव्या दिवशी रुग्णाला फोन करुन रुग्णाच्या प्रकृतीची माहिती घेतली जाते

६ मिनिटाची स्वतः करा चाचणी

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही आवाहन केलं आहे. त्यानुसार ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी लक्षणे जाणवताच वेळ न दवडता उपचार सुरू करावे. गावात आशा व अंगणवाडी सेविकेमार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. कोरोनासाठी वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या सल्यानुसार ६ मिनीट चालण्याची जलद चाचणी करता येईल. त्यात चालण्यापूर्वी केलेली एखादया व्यक्तीची ऑक्सिजन (प्राणवायू ) पातळी व चालल्यानंतरची प्राणवायू पातळी यात जर 4 पेक्षा जास्त फरक असेल तर ते गंभीर आहे. ताप ,सर्दी ,खोकला,असल्यास वेळकाढूपणा न करता लवकर वैद्यकीय उपचार सुरू करण्याचे गरजेचे आहे. आरोग्याची स्थिती ढासळण्यापूर्वी नागरिकांनी नागपूर येथील शासकीय किंवा खासगी रूग्णालयात धाव घ्यावी. त्यासाठीच समन्वय कक्षाची स्थापना केली आहे.

ऑक्सिजनसाठा मुबलक उपलब्ध

जिल्हयात ऑक्सिजन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तुटवडयाची कोणतीही तक्रार नाही. जिल्हयातील ऑक्सिजन उत्पादकांखेरीज भिलाई स्टिल प्लॉन्टवरून देखील पुरवठा होत असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. रेमडीसीव्हर औषधाच्या साठ्याची माहिती घेण्यात येत असून मेडिकल स्टोअर्स मधून रेमडीसीव्हर वर विक्री करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. आता पुरवठादार थेट हॉस्पिटलला आणि हॉस्पिटल संबंधित मेडिकल स्टोअर्सलाच पुरवठा करणार आहे .खासगी रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची तपासणी, अन्न आणि औषध प्रशासन विभागातील चमूमार्फत करण्यात येणार आहे. तसेच चाचण्याच्या संख्येचे अपलोडिंग आणि देयक तफावतीतील अपप्रकारांची देखील शहानिशा करत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरकरांनी ब्रेक द चेनमधील निर्बधासह मास्क,सॅनीटायजरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

संबंधित बातम्या 

Nagpur Corona | दिल्ली-गुजरातपेक्षाही अधिक कोरोनाबळी, नागपुरातील वाढत्या मृत्यूदराची 8 कारणं

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.