AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Corona | दिल्ली-गुजरातपेक्षाही अधिक कोरोनाबळी, नागपुरातील वाढत्या मृत्यूदराची 8 कारणं

पहिली लाट कमी झाल्यानंतर नागरिकांमधील कोरोनाची भीती कमी झाली, त्यामुळे नागरिक नियम न पाळता बाहेर पडले, हे वाढत्या संसर्ग आणि मृत्यूचे महत्त्वाचे कारण मानले जाते (Nagpur Corona deaths COVID)

Nagpur Corona | दिल्ली-गुजरातपेक्षाही अधिक कोरोनाबळी, नागपुरातील वाढत्या मृत्यूदराची 8 कारणं
प्रतिकात्मक फोटो
| Updated on: Apr 02, 2021 | 2:58 PM
Share

नागपूर : नागपुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं तांडव सुरु आहे. दिल्ली आणि गुजरात राज्यात कोरोनामुळे जितके मृत्यू झाले नाहीत, तितके एकट्या नागपुरात होताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनासोबतच नागपूरकरांची चिंता वाढली आहे. नागपुरात मृत्यूदर इतका का वाढत आहे, याविषयी खास रिपोर्ट. (Nagpur Corona Update why rapid growth in number of deaths due to COVID in Nagpur)

राज्याची उपराजधानी नागपूर कोरोनाच्या विळख्यात आली आहे. सोबतच इथे मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. दर दिवसाला 3 हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. मार्च महिन्याच्या 27 तारखेपासून मृत्यूचा आकडा 50 च्या वर पोहोचला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी 60 जणांचा मृत्यू झाला.

नागरिकांची हलगर्जी जीवावर

कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावरही सुरुवातीचे काही दिवस औषधोपचार करुन नागरिक घरीच राहत आहेत. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि कोरोना चाचणी करुन घेणे आवश्यक आहे, परंतु नागरिक ते करत नसल्याचे चित्र नागपुरात बघायला मिळत आहे. हे सगळं चित्र नागपूरकरांची झोप उडवणारं आहे. सोबतच प्रशासनाच्या व्यवस्थेची पोलखोल सुद्धा करत आहे. आयएमएचे सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांच्या माहितीनुसार नागपुरात वाढत्या मृत्यूसंख्येची कारणं पाहुयात

नागपूरमध्ये कोरोना मृत्यू दर वाढण्यामागील कारणं कोणती?

1. पहिली लाट कमी झाल्यानंतर नागरिकांमधील कोरोनाची भीती कमी झाली, त्यामुळे नागरिक नियम न पाळता बाहेर पडले 2. थोडा ताप किंवा खोकला वाटल्यास गोळ्या घेऊन घरीच राहणे 3. डॉक्टरांचा सल्ला न घेणे 4. कोरोना टेस्ट सांगून सुद्धा न करणे 5. लक्षण वाढल्यानंतर रुग्णालयात जाणे, तोपर्यंत केस डॉक्टरांच्या हाताबाहेर गेलेली असते 6. इतर आजार आणि कोरोना एकत्र आल्यामुळे मृत्यूची शक्यता जास्त 7. डॉक्टरकडे उशिरा पोहचणे, त्यातही ऑक्सिजन लागणारे रुग्ण जास्त असल्याने प्रक्रियेस उशीर होणे 8. बेडची संख्या कमी असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढते

नागपुरात वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू

27 मार्च – 3688 रुग्ण , 54 मृत्यू 28 मार्च – 3970 रुग्ण , 58 मृत्यू 29 मार्च – 3177 रुग्ण , 55 मृत्यू 30 मार्च – 1156 रुग्ण , 54 मृत्यू 31 मार्च – 2885 रुग्ण , 58 मृत्यू 1 एप्रिल – 3639 रुग्ण , 60 मृत्यू

नागपुरात आता सरकारी आणि खाजगी रुग्णालयात किती बेड शिल्लक

ऑक्सिजन बेड – 246 आयसीयू बेड – 32 व्हेंटिलेटर बेड – 11

एवढेच बेड शिल्लक असून त्यातही काही बेड राखीव ठेवावे लागतात. त्यामुळे अनेक रुग्णांना बेडच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागपुरात कोरोनामुळे जाणाऱ्या बळींची संख्या वाढत आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना नियमांचं उल्लंघन, एकाच दिवशी 50 हजार रुपयांचा दंड वसूल, नागपूर महापालिकेचा दणका

Pune Lockdown : पुण्यात मिनी लॉकडाऊन, वाचा संपूर्ण नियमावली

(Nagpur Corona Update why rapid growth in number of deaths due to COVID in Nagpur)

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.