AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Lockdown : पुण्यात मिनी लॉकडाऊन, वाचा संपूर्ण नियमावली

पुण्यातील वाढती कोरोना रुग्णांची स्थिती पाहता कडक निर्बंध लादले गेले आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधत पुण्यातील मिनी लॉकडाऊनची नियमावली सांगितली. | Pune Mini Lockdown

Pune Lockdown : पुण्यात मिनी लॉकडाऊन, वाचा संपूर्ण नियमावली
पुण्यात मिनी लॉकडाऊन
| Updated on: Apr 02, 2021 | 2:16 PM
Share

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांचा (Pune Corona Update) उद्रेक झालेला आहे. दररोज जवळपास चार ते साडे चार हजार रुग्णसंख्या मिळत आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णालयांतील बेड्सची समस्या देखील उद्भवू लागली आहे. आज उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव  (Saurabh Rao) यांनी माध्यमांशी संवाद साधत पुण्यातील मिनी लॉकडाऊनची (Pune mini Lockdown) नियमावली सांगितली. (Pune mini lockdown update rules And Regulation Guidelines Saurabh Rao Press)

पुण्यातलं मिनी लॉकडाऊन कसं असेल?

लॉकडाऊन कुणालाच नको आहे मात्र वाढणारी रुग्णसंख्या पाहता कडक निर्बंध तर लादावे लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात पुढील काही दिवसांसाठी काही नियम आखले आखले आहेत. नव्या नियमांनुसार सार्वजनिक बससेवा, धार्मिक स्थळं, हॉटेल, रेस्टॉरंट सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

दिवसभर जमावबंदी, संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी

संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. दिवसभर जमावबंदी असणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळं बंद…

सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील. मॉल आणि सिनेमा हॉल 7 दिवसांसाठी बंद राहतील. तसंच धार्मिक स्थळं देखील पुढील 7 दिवसांसाठी बंद असतील.

पुण्यातील PMPML बससेवा बंद

पुण्यातील PMPML बससेवा पुढील 7 दिवस बंद राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. तसंच आठवडे बाजारही बंद राहणार आहे.

लग्न, आणि अंत्यसंस्कारांना परवानगी, बाकी कार्यक्रमांना नाही…

लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत, हा देखईल मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिम सुरु राहणार

पुण्यातील जीम सुरु राहणार आहे. जीम बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत, शाळा महाविद्यालय 30 एप्रिल पर्यंत बंद

दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. तसंच शहरातील शाळा महाविद्यालय 30 एप्रिल बंद राहणार

पुण्याची परिस्थिती गंभीर

पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, “पुण्यातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील”.

“बेडची संख्या वाढवणार आहे,टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय आहे. सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक आहे.”

(Pune mini lockdown update rules And Regulation Guidelines Saurabh Rao Press)

हे ही वाचा :

Pune Lockdown Update | पुण्यात काय चालू काय काय बंद राहणार? आढावा बैठकीत मोठा निर्णय

राज्यात लॉकडाऊन की कठोर निर्बंध?; मुख्यमंत्री आज रात्री संवाद साधणार

पुण्यात मिनी लॉकडाऊन, दहावी-बारावी, MPSC परीक्षांचं काय?

कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.