हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट, सुपारी किलरच ड्रायव्हर बनून आला, बहिणीने भावाला घेत…धक्कदायक घटना समोर

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर नागपूरमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं. मात्र गुन्हा लपवण्यासाठी हा फक्त बनाव करण्यात आला होता. मास्टरमाईंड सूनेने सासऱ्याला संपवण्यासाठी भावाची मतद घेतली. नागपूर पोलिसांनी चतुराईने हे प्रकरण उघडं पाडत आरोपी सुनेसह भावाला अटक केली.

हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट, सुपारी किलरच ड्रायव्हर बनून आला, बहिणीने भावाला घेत...धक्कदायक घटना समोर
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 8:01 PM

सासऱ्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती केवळ आपल्यालाचं मिळावी या हेतूने नागपुरात एका सुनेने सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पुरुषोत्तम पुट्टेवार असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. नागपूरमधील ही घटना असून पोलिसांनी हिट अँड रन प्रकरण नसून सुपारी किलिंग असल्याचं तपासात समोर आणलं आहे. सासऱ्याचा संपत्तीवर डोळा असलेल्या सुनेने भावालासोबत घेत कट रचला होता. अपघात दाखवण्याचा प्रयत्न होता मात्र पोलिसांच्या नजरेतून ती सुटू शकली नाही.

नागपूरच्या बालाजी नगर परिसरात 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र,हा अपघात नसून सुपारी किलिंग असल्याचं तपासात उघड झाले आहे.पुरुषोत्तम पुट्टेवार यांची नागपुरात अनेक कोटीची संपत्ती आहे. पुरुषोत्तम आणि त्याचा मुलात संपत्तीचा वाद न्यायालयात सुरू होता. पुरुषोत्तम संपूर्ण संपत्ती दुसऱ्या मुलांना देतील या भीतीने सून अर्चना पुट्टेवार यांनी तिचा भाऊ प्रशांत वाटेकर यांच्या मदतीने सासऱ्याच्या हत्येचा कट रचला.अर्चनाला सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा काटा कायमचा काढायचा होता. मात्र,त्यासाठी एका सुपारी किलरची आवश्यक होती. अर्चना हिने ही आयडिया तीचा भाऊ प्रशांतला सांगितली.

प्रशांतने सुपारी किलर म्हणून सार्थक नावाच्या इसमाला जबाबदारी सोपवली. त्याला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवण्यात आले. सार्थक याने दुसऱ्या आरोपीच्या मदतीने २२ मे रोजी भरधाव कारने पुरुषोत्तम पुट्टेवार यांना चिरडल्यानंतर पळ काढला होता.मुख्य आरोपी अर्चनाच्या आदेशावरून सार्थकने दोनदा पुरुषोत्तम पुट्टेवार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्यावेळी ते थोडक्यात वाचले होते म्हणून आरोपींनी त्यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने एक कार विकत घेतली आणि २२ मे ला ती कार पुरुषोत्तम पुट्टेवारच्या अंगावर घातून त्याची हत्या केली.

सासरे मंगेश पुट्टेवार गडचिरोलीत टाऊन प्लॅनिंग विभागात उच्चपदस्थ अधिकारी होते. अर्चनाने तिचा भाऊ प्रशांतच्या मदतीने सुपारी देऊन सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांना भर रस्त्यामध्ये भरधाव कारने चिरुडन हत्या केली होती. या घटनेनंतर तब्बल 18 दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूर पोलिसांनी अर्चना पुट्टेवार यांच्यासह तिचा भाऊ प्रशांत वाटेकर आणि प्रत्यक्षात हत्याकांड घडवणाऱ्या दोनही भाडोत्री सुपारी किलरला देखील अटक करण्यात आली आहे.

पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणाची मास्टरमाइंड ही त्यांची सून अर्चना असून या कामात अर्चनाचा भाऊ प्रशांत हा सहभागी आहे. प्रशांतने सार्थक आणि अन्य आरोपीची मदत घेतली. याशिवाय अर्चनाची पर्सनल सेक्रेटरी पायल नागेश्वर हिचा देखील सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी एकूण सहा आरोपीना अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात....
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात.....
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?.
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र.
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले.