Kalamna flyover bridge collapse : नागपूरमध्ये उड्डाणपुलाचा गर्डर का कोसळला? NHAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण

नागपूरमधील कळमना परिसरातील उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याची घटना बेअरिंग फेल्युअरमुळे घडली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांनी दिलीय.

Kalamna flyover bridge collapse : नागपूरमध्ये उड्डाणपुलाचा गर्डर का कोसळला? NHAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण
नागपूरमध्ये उड्डाणपुलाचा भाग कोसळला
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 2:32 PM

नागपूर: नागपूरमधील कळमना परिसरातील उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याची घटना बेअरिंग फेल्युअरमुळे घडली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांनी दिलीय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे निर्माण करण्यात येत असलेला उड्डाणपुलाचा निर्माणाधीन भाग मंगळवारी रात्री अचानक कोसळल्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चौकशी सुरू केली आहे. नागपुरातील व्हीएनआयटी आणि नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया, दिल्ली मुख्यालयाची टीम या घटनेचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार असून जर कंत्राटदार दोषी आढळला तर कठोर कारवाई करण्यात येईल, असे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नागपूर क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांनी सांगितले. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसनं या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

नागपूरात उड्डाणपुलाचा भाग पडल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नहायच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नहायच्या कार्यालया घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही पोलीस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने होते. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या कळमना परिसरात काल रात्री निर्माणाधीन उड्डाण पुलाचा गर्डर कोसळला, उडानपूल गर्डर कोसळताना आलेल्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. त्यावेळेस रस्त्यावर वाहतूक नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, आता राष्ट्रवादीचे कार्यककर्ते आक्रमक झालेत. “2014 ला भूमिपूजन झालेल्या या पुलाचं आजपर्यंत काम पूर्ण झालं नाही, आतापर्यंत या पुलामुळे अनेकांचा जीव गेलाय, त्यामुळे NHAI च्या अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीनं केलीय.

शिवसेना आक्रमक

नागपूरच्या कळमना परिसरात काल रात्री निर्माणाधीन उडानपुलाचा गर्डर कोसळला तिथे शिवसेनेनं आंदोलन केलंय. “2014 ला भूमिपूजन झालेल्या या पुलाचं आजपर्यंत काम पूर्ण झालं नाही, आतापर्यंत या पुलामुळे अनेकांचा जीव गेलाय, त्यामुळे या सर्वांना न्याय मिळावा, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक नेते गुड्डू रहांगडाले यांनी केलीय. याबाबत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

महापौरांकडून पाहणी

नागपूरच्या कळमना परिसरातील निर्मानधीन उडाण पुलाचा काही भाग कोसळला, घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली.काही वेळातच या ठिकाणी शहराचे महापौर दयाशंकर तिवारी सुद्धा पोहचले. त्यांनी घटना दुर्दैवी असल्याचं सांगत या संपूर्ण घटनेची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना देण्यात येईल आणि यात कोणाची चुकी आहे, याची चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या:

धक्कादायक! शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ, सामुहिक बलात्कार, औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडाळीतील घटना

20X सुपर रेस झूम कॅमेरा, रिअल टाईम ट्रान्सलेशन फीचरसह Google Pixel 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेक्स

Nagpur kalamna flyover bridge collapse NHAI officer Rajeev Agrawal told the reason of Girder Collapse

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.