लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा मेगा प्लॅन; राज ठाकरे यांची सभा अन् चार जागा जिंकण्याचा विश्वास

MNS Leader Raju Umbarkar on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे. विदर्भात चार जागा जिंकण्याचा विश्वास मनसेकडून व्यक्त करण्यात आला आहेे. राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा मेगा प्लॅन; राज ठाकरे यांची सभा अन् चार जागा जिंकण्याचा विश्वास
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 1:17 PM

गजानन उमाटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 08 नोव्हेंबर 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसेकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात घवघवीत यश मिळण्याचा दावा मनेसकडून करण्यात आला आहे. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे विदर्भात सभा घेणार असल्याचंही म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे ही निवडणूक कशी लढणार याचा प्लॅन मनसे नेते राजू उंबरकर यांनी सांगितला आहे. तसंच या निवडणुकीत जिंकण्याचा विश्वासही उंबरकर यांनी व्यक्त केला आहे.

विदर्भात चार जागा लढवणार

मनसे नेते राजू उंबरकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे, असं म्हणत राजू उंबरकर यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. तसंच या चार जागा मनसे जिंकेल, असंही उंबरकर म्हणाले आहेत.

कोणत्या मतदारसंघात मनसे लढणार?

चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघ, वाशिम लोकसभा मतदारसंघ, अमरावती आणि बुलढाणा मतदारसंघात मनसे आपले उमेदवार देणार आहे, असं उंबरकर म्हणालेत. काँग्रेसकडे असलेल्या चंद्रपूर – वणी लोकसभा मतदारसंघासाठी मनसेनं कंबर कसली आहे. खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातंही मनसे निवडणूक लढणार आहे. अमरावती आणि बुलढाणा मतदारसंघातही लढण्याची मनसेची तयारी आहे, असं राजू उंबरकर यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांची सभा होणार

राज ठाकरे यांच्या सभा गाजतात. निवडणूक काळात तर राज ठाकरे आपल्या भाषणाने विरोधकांचे वाभाडे काढतात. या सभांमुळे विरोधकांचे धाबे दणाणतात. या सभांमुळे मनसेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास राजू उंबरकर यांनी व्यक्त केला आहे. विदर्भात ज्या मतदारसंघात मनसे आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. त्या ठिकाणी राज ठाकरे दौरा करणार आहेत. राज ठाकरे विदर्भात सभा घेणार आहेत, असं राजू उंबरकर यांनी सांगितलं आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.