Nagpur NMC | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार का?, सामान्य कार्यकर्त्यांना काय वाटतं?

नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास नक्कीच दोन्ही पक्षांचा फायदा होईल. सामान्य कार्यकर्त्यांनाही ते एकत्र यावे, असं वाटतं. पण, नेत्यांमध्ये मनोमीलन होणार का, यावर सर्व अवलंबून आहे.

Nagpur NMC | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार का?, सामान्य कार्यकर्त्यांना काय वाटतं?
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 6:40 AM

नागपूर : राज्यातील नगरपंचायतीचे निकाल नुकतेच लागले. यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बरेच काही चिंतन करता येईल. दोन्ही पक्षांनी स्वबळाची भाषा केल्यास त्याचा फायदा भाजपाला होतो, हे दोन्ही पक्षांच्या लक्षात आले आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत (Nagpur Municipal Corporation election) हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल. पण, या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मनं जुळणं आवश्यक आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राष्ट्रवादीला हद्दपार करण्याची भाषा बोलतात. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवा, असे निर्देश पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना दिले आहे. खरं तर प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले हे दोन्ही नेते भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील आहेत. पण, दोघेही त्यांच्या त्यांच्या पक्षाचे नेतृत्व नागपुरात करताना दिसून येतात. पटेल आणि पटोले हे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून एकमेकांविरोधात लढले आहेत. अशीच लढत नागपुरातही कायम ठेवल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र (Congress-NCP will come together) येतील, असं दिसत नाही.

पटोलेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दुखावले

नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्व अनिल देशमुख यांच्याकडे होते. पण, ते सध्या कैदेत आहेत. त्यामुळं प्रफुल्ल पटेलांनी नागपुरात लक्ष केंद्रित केलंय. मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुरात सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर पटेल यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे निर्देश दिले. त्यामुळं राष्ट्रवादी शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घेते, हे पाहावे लागेल. कारण नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याने राष्ट्रवादी दुखावली गेली. विदर्भातील राष्ट्रवादीचे एकमेव दुकान बंद पडेल, असं पटोले म्हणाले होते.

राष्ट्रवादी स्वबळावर लढल्यास काँग्रेसलाही बसेल फटका

राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. काँग्रेससोबत नागपुरात दोन्ही पक्ष निवडणुकीत एकत्र आले नाही, तर कोणत्या जागा लढवायच्या याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सुमारे ४० जागांवर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. अशा ठिकाणी उमेदवारी देऊन त्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे राष्ट्रवादीने ठरविले आहे. असं केल्यास काँग्रेसलाही याचा चांगलाच फटका बसेल.

Nagpur Butterfly Video : विदर्भातलं बोलणारं फुलपाखरू पाहिलंय? अॅपच्या माध्यमातून साधतंय संवाद

Nagpur NMC | नगरसेविकेच्या पतीने सोडली कचरागाडीची हवा!; नागपुरात नेमकं काय घडलं?

रोजगार मागणाऱ्या तरुणांच्या हाती वाईनची बाटली का?; व्यापारी संघाचे ज्ञानेश्वर रक्षक यांचा सवाल

Non Stop LIVE Update
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?.
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?.
शिंदे यांना शिवीगाळ अन् दत्ता दळवी यांना अटक, राऊत यांनाही होणार अटक?
शिंदे यांना शिवीगाळ अन् दत्ता दळवी यांना अटक, राऊत यांनाही होणार अटक?.