AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर शिवसेनेत गटबाजीला ऊत, चतुर्वेदींच्याविरोधात थेट उद्धव ठाकरेंना पत्र

नागपूर शहरातील तीन माजी जिल्हाप्रमुखांच्या सहीचं पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलं आहे. (Nagpur Shivsena Dushyant Chaturvedi )

नागपूर शिवसेनेत गटबाजीला ऊत, चतुर्वेदींच्याविरोधात थेट उद्धव ठाकरेंना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Jan 22, 2021 | 11:20 AM
Share

नागपूर : शिवसेना राज्यात भाजपला टक्कर देण्याची भाषा करत आहे, मात्र भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातच शिवसैनिकांमध्ये गटबाजी उफाळून आल्याचं दिसत आहे. नाराज शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे. दुष्यंत चतुर्वेदी संपर्कप्रमुख नको, अशी मागणी नागपुरातील नाराज शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. (Nagpur Shivsena leaders unhappy with Dushyant Chaturvedi writes to CM Uddhav Thackeray)

नागपूर शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन गटांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यासोबतच नाराज शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर शिवसेनेतील गटबाजी उघड झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

तीन माजी जिल्हाप्रमुखांचं उद्धव ठाकरेंना पत्र

नागपूर शहरातील तीन माजी जिल्हाप्रमुखांच्या सहीचं पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलं आहे. शेखर सावरबांधे, सतीश हरडे, बंडू तागडे यांचे गट आक्रमक झाले आहेत. सध्याचे नागपूर शहर संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी आहे. त्यामुळे नागपुरात दुसरा संपर्कप्रमुख देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिका निवडणूकीपूर्वी मुंबईतील नेत्यांनी समन्वय करावं, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. 26 जानेवारीला नाराज शिवसैनिक उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपली व्यथा मांडणार आहेत.

शिवसैनिकांची उघड नाराजी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना समन्वयकांनी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे मांडली. पक्षासाठी कित्येक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून प्रमुख पदं दिल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यांनतर शहरातील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेसी भगाव’च्या घोषणा देत राजीनामे दिले. (Nagpur Shivsena leaders unhappy with Dushyant Chaturvedi writes to CM Uddhav Thackeray)

चतुर्वेदींच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी शिवसेनेत

आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने पक्षबांधणीसाठी जोरात प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच भाग म्हणून शिवसेनेने काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावलं. आधी दुष्यंत चतुर्वेदी काँग्रेसमधून शिवसेनेत आले. त्यानंतर चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात  काँग्रेस कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. नागपुरात आधी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पेटली होती. मात्र आता शिवसेनेतच अंतर्गत दुफळी समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

विदर्भात काँग्रेसला खिंडार, दुष्यंत चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश

आयारामांना पदं दिल्याने शिवसेनेत असंतोष, ‘काँग्रेसी भगाव’च्या घोषणा देत राजीनामे

(Nagpur Shivsena leaders unhappy with Dushyant Chaturvedi writes to CM Uddhav Thackeray)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.