Nagpur Crime: चोरट्याला एका गुन्ह्यासाठी घेतले ताब्यात; पोलिसीखाक्या दाखवताच 19 गुन्ह्यांची दिली कबुली

चोरीच्या आरोपाखाली ज्याला अटक करण्यात आली आहे, त्याला व्यसनाची प्रचंड सवय असून चैनीमध्ये राहण्यासाठी सगळं तो कृत्य करत असल्याचे त्याने सांगितले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्ये उघड होतात का त्याची चौकशी सुरू आहे.

Nagpur Crime: चोरट्याला एका गुन्ह्यासाठी घेतले ताब्यात; पोलिसीखाक्या दाखवताच 19 गुन्ह्यांची दिली कबुली
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 1:25 PM

नागपूरः नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन (Nagpur Tahasil Police Station) हद्दीत येणाऱ्या इतवारी मार्केट परिसरात चेन स्नॅचिंग (Chain snatching) अनेक घटना घडत असल्याने पोलिसांनी त्यावर लक्ष केंद्रित केले होते. एक आरोपी संशयितरित्या या परिसरात वावरत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची उलट तपासणी करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून चैन स्नॅचिंगसह 19 गुन्ह्यांची त्याने कबुली दिली आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीत त्याने नागपूरसह, चंद्रपूर, भंडारा अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन चैन स्नॅचिंग आणि 19 चोरीच्या घटना केल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी आता त्याला बेड्या ठोकल्या असून त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी आहे का? आणि यापेक्षा जास्त घटना त्यांनी केल्या आहेत का याचा शोध पोलीस घेत आहे

नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी हा नागपूर शहरात राहत होता, त्यावेळी या सगळ्या चोऱ्या तो करत होता.

व्यसनासाठी करायचा चोरी

चोरीच्या आरोपाखाली ज्याला अटक करण्यात आली आहे, त्याला व्यसनाची प्रचंड सवय असून चैनीमध्ये राहण्यासाठी सगळं तो कृत्य करत असल्याचे त्याने सांगितले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्ये उघड होतात का त्याची चौकशी सुरू आहे.

चोरट्याकडून19 गुन्हे

नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून चैन स्नॅचिंग, बॅग पळवणे, छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले होते, त्यामुळे पोलिसांनी पाळत ठेऊन चैन स्नॅचिंग करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आतापर्यंत 19 गुन्ह्ये उघड झाले असून आणखी काही गुन्हे त्याच्याकडून उघड होतात का त्याची चौकशी पोलीस करत आहेत.

अनेक गुन्ह्यांची कबुली

नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याने आपण केलेल्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली असली तरी त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उखल होते का त्याचा तपास पोलीस करत आहेत. तब्बल 19 गुन्ह्यांची कबुली चोरट्याने दिली असल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. आपल्याला व्यसन लागले असून त्यासाठी मी चोरी करत असल्याचेही त्याने सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.