Nagpur ZP Winner List: नागपूरमध्ये काँग्रेसनं करुन दाखवलं, भाजपच्या गडात जोरदार मुसंडी, विजयी सदस्यांची यादी एका क्लिकवर

मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 गटांसाठी निवडणूक लागली होती. काँग्रेसने 9 जागांवर विजय मिळवला.

Nagpur ZP Winner List:  नागपूरमध्ये काँग्रेसनं करुन दाखवलं, भाजपच्या गडात जोरदार मुसंडी, विजयी सदस्यांची यादी एका क्लिकवर
Nagpur ZP Winner List
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 5:03 PM

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केले. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार, पालघर या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या प्रमुख भाजप नेत्यांचा गड असूनही काँग्रेसनं नागपूरमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूरमध्ये मंत्री सुनील केदार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर, मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 गटांसाठी निवडणूक लागली होती. काँग्रेसने 9 जागांवर विजय मिळवला तर भाजपनं 03, राष्ट्रवादीनं 2 आणि 2 इतर उमेदवारांनी जिल्हा परिषदेत विजय मिळवला आहे. नागपूरमधील जिल्ह्यातील विविध पंचायत समितीच्या 31 जागांपैकी भाजपनं 6, राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 जागांवर आणि काँग्रेसनं 21 जागांवर आणि 2 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल

01) केळवद- सुमित्रा कुंभारे- काँग्रेस 02) वाकोडी- ज्योती सिरसकर- काँग्रेस 03) राजोला- अरुण हटवार- काँग्रेस 04) गुमथाळा- दिनेश ढोल- काँग्रेस 05) वदोडा-अवंतीका लेकुरवाळे- काँग्रेस 06) आरोली- योगेश देशमुख- काँग्रेस 07) करंभाड- अर्चना भोयर- काँग्रेस 08) निलडोह- संजय जगताप- काँग्रेस 09) गोधणी (रेल्वे)- कुंदा राऊत- काँग्रेस 10) येनवा- समीर उमप- शेकाप 11) डिगडोह-रश्मी कोटगुले- राष्ट्रवादी 12) भिष्णुर- प्रवीण जोध राष्ट्रवादी 13) बोथीय पालोर- हरिष उईके- गोंडवाना 14) पारडशिंगा- मीनाक्षी सरोदे- भाजप 15) सावरगाव – पर्वता काळबांडे- भाजप 16) इससानी- अर्चना गिरी- भाजप

Nagpur ZP

नागपूर जिल्हा परिषद

नागपूरमध्ये सुनील केदार यांनी करुन दाखवलं

नागपूरमधील जिल्हा परिषदेच्या 16 व पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीसाठी भाजपचे मोठे नेते मैदानात प्रचारासाठी ताकदीनं उतरले नव्हते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या प्रचाराची कमान सांभाळली तर दुसरीकडे काँग्रेसकडून मंत्री सुनील केदार यांनी एकहाती प्रचाराची बाजू सांभाळली. अनिल देशमुख प्रचारात नसल्याने राष्ट्रवादीची मोठी गोची झाली. तर, दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचाही मुद्दा या निवडणुकीत चांगलाच गाजला होता. मात्र, निवडणूक निकालातून सुनील केदार यांनी विरोधकांना त्यांची ताकद दाखवून दिली आहे.

इतर बातम्या:

गड भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पण मुसंडी काँग्रेसची, नागपूर झेडपीला काँग्रेसला दणदणीत यश

ZP Elections : भाजपला काँग्रेसच रोखू शकतं, नाना पटोलेंचा दावा; मतदानाच्या टक्केवारील भाजपचा आसपासही कुणी नाही, दरेकरांचं प्रत्युत्तर

Akola ZP Election Result : अकोल्यात शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना समान मतं, विजयी उमेदवार कोण? चिठ्ठीचा कौल कुणाला?

 Nagpur ZP Election Result 2021 Winners List in Marathi BJP vs Shivsena vs Congress Party wise candidate name final tally

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.