ZP Elections : भाजपला काँग्रेसच रोखू शकतं, नाना पटोलेंचा दावा; मतदानाच्या टक्केवारील भाजपचा आसपासही कुणी नाही, दरेकरांचं प्रत्युत्तर

महाविकास आघाडीतील घटकपक्षात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. तर पंचायत समितीच्या 144 जागांपैकी 138 जागांचे कल हाती आले आहेत. त्यात काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय.

ZP Elections : भाजपला काँग्रेसच रोखू शकतं, नाना पटोलेंचा दावा; मतदानाच्या टक्केवारील भाजपचा आसपासही कुणी नाही, दरेकरांचं प्रत्युत्तर
नाना पटोले, प्रवीण दरेकर
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Oct 06, 2021 | 2:46 PM

मुंबई : राज्यातील सहा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल आज आहे. सहा जिल्ह्यातील मिळून जिल्हा परिषदेच्या 85 जागांपैकी 84 झागांचे कौल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यात भाजपचं सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र महाविकास आघाडीतील घटकपक्षात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. तर पंचायत समितीच्या 144 जागांपैकी 138 जागांचे कल हाती आले आहेत. त्यात काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. (Zilla Parishad, Panchayat Samiti by-election results, Allegations of Nana Patole and Praveen Darekar)

मतदारांनी काँग्रेसला साथ दिली – पटोले

सहा जिल्ह्यातील जनतेचे आभार आम्ही या जिल्हा परिषद, पंचायत समितीनिमित्त एक सुरुवात केली आहे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. काही ठिकाणी आम्ही संघटनात्मक मागे पडलो. तिथेही काही दिवसांत आम्ही काम करु. खरं तर आज भाजप देशातील वागणूक, शेतकरी विरोधी धोरण, वाढती महागाई, संविधान विरोधी धोरण या सगळ्याला कांग्रेसच थांबवू शकतं हे लोकांनी मान्य केलंय. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे, असं पटोले म्हणाले.

लोकशाहीत जनता मोठी आहे. जनतेचा विश्वास सर्वात मोठा असतो. आमच्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करुन आम्ही जनतेसमोर जाऊ, असं मी म्हटलं होतं. त्याची सुरुवात आता झाली आहे. आज देश बरबाद होतोय. त्याविरोधात काँग्रेस लढत आहे. जिल्हा परिषदेत भाजप आमच्यापेक्षा पुढे आहे. मात्र पंचायत समितीत आम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहोत, असं पटोले म्हणाले.

भाजपला टक्कर देण्यासाठी असे अनेक प्रयोग करावे लागतील- दरेकर

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिलंय. भाजपला टक्कर देण्यासाठी असे अनेक प्रयोग करावे लागतील. आज काँग्रेसला नवसंजिवनी मिळाली आहे. जो पक्ष दुर्लक्षिला गेला होता त्यांना महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळाल्यानं त्यांना नवसंजिवनी मिळाली असंच म्हणावं लागेल. महाविकास आघातीत शिवसेनेची अत्यंत दयनीय अवस्था आहे त्यांना तिसऱ्या क्रमांकावर जावं लागलं. भाजप मजबूत आहे. त्यांना तिघांना मिळून टक्कर द्यावी लागत आहे. एकाने टक्कर द्यायचं ठरवलं तर त्यांची काय अवस्था होईल याचा त्यांनी विचार करावा, असा टोला दरेकरांनी लगावलाय. भाजपला सहा जिल्ह्यात जी मतदानाची टक्केवारी मिळाली आहे, त्याच्या आसपासही कुणी नाही, असंही दरेकर म्हणाले.

जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाला किती जागा? (दुपारी 2 वाजेपर्यंत)

भाजप – 23
शिवसेना – 11
राष्ट्रवादी काँग्रेस – 17
काँग्रेस – 17
इतर – 16

पंचायत समितीत कोण्यात पक्षाला किती जागा? (दुपारी 2 वाजेपर्यंत)

भाजप – 32
शिवसेना- 19
राष्ट्रवादी काँग्रेस – 16
काँग्रेस – 34
इतर – 37

इतर बातम्या :

Akola Election Result : अमोल मिटकरींचा गावातच पराभव, बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ची धडाकेबाज एण्ट्री

Dhule ZP Election : धुळे जिल्हा परिषदेत भाजपनं सत्ता राखली, महाविकास आघाडीचा बार फुसका!

Zilla Parishad, Panchayat Samiti by-election results, Allegations of Nana Patole and Praveen Darekar

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें