Dhule ZP Election : धुळे जिल्हा परिषदेत भाजपनं सत्ता राखली, महाविकास आघाडीचा बार फुसका!

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं 29 ची मॅजिक फिगर पार केलीय. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे लामक गटातून विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर भाजपला जिल्हा परिषदेत आपली सत्ता कायम राखण्यासाठी 2 जागांची आवश्यकता होती. तिथे भाजपनं 6 जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलंय.

Dhule ZP Election : धुळे जिल्हा परिषदेत भाजपनं सत्ता राखली, महाविकास आघाडीचा बार फुसका!
धरती देवरे, धुळे जिल्हा परिषद
चंदन पुजाधिकारी

| Edited By: सागर जोशी

Oct 06, 2021 | 1:39 PM

धुळे : राज्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत एकटे लढूनही भाजपचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडीतील घटकपक्षांना धक्का बसलेला पाहायला मिळतोय. धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपनं आपली सत्ता राखली आहे. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं 29 ची मॅजिक फिगर पार केलीय. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे लामक गटातून विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर भाजपला जिल्हा परिषदेत आपली सत्ता कायम राखण्यासाठी 2 जागांची आवश्यकता होती. तिथे भाजपनं 6 जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. (BJP retains power in Dhule Zilla Parishad by-election)

धुळे जिल्हा परिषद : कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 06
शिवसेना – 01
राष्ट्रवादी काँग्रेस – 02
काँग्रेस – 01

धुळे पंचायत समिती : कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 12
शिवसेना – 03
राष्ट्रवादी – 01
काँग्रेस – 03

जयकुमार रावल यांची महाविकास आघाडीवर टीका

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं आपली सत्ता कायम राखली आहे. त्यानंतर भाजप नेते जयकुमार रावल यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. महाविकास आघाडी सरकारच्या वसुलीविरोधात दिलेला हा कौल आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा झाल्या. पैसे वाटले. मात्र तरीही त्यांचा पराभव झाला, अशी टीका रावल यांनी केलीय.

मागील निवडणुकीत धुळे जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

भाजप – 39
काँग्रेस – 7
शिवसेना – 4
राष्ट्रवादी – 3
अपक्ष – 3

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर कुठल्या पक्षाच्या किती जागा कमी झाल्या?

भाजप – 12
काँग्रेस – 1
शिवसेना – 2

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर कुठल्या पक्षाकडे किती आहेत जागा शिल्लक?

भाजप : 39 – 12 = 27
काँग्रेस : 7 -1 = 6
शिवसेना : 4 -2 = 2
राष्ट्रवादी : 3
अपक्ष : 3

इतर बातम्या :

शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, खासदारपुत्राचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पराभव

VIDEO: पालघर जिल्हापरिषदेत थेट निवडणुकीत भाजपला धक्का; नंडोरे देवखोपच्या जागेवर शिवसेनेचा भगवा फडकला

BJP retains power in Dhule Zilla Parishad by-election

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें