Nitin Gadkari : चंद्रशेखर बावनकुळेंनी बायकोसुद्धा पळवून आणली होती, बावनकुळेंच्या सत्कार सोहळ्यात गडकरींची फटकेबाजी

नितीन गडकरी म्हणाले, भाजपची जिल्ह्यातील स्थिती चांगली नव्हती. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यानंतर कामठी मतदारसंघ मजबूत केलं.

Nitin Gadkari : चंद्रशेखर बावनकुळेंनी बायकोसुद्धा पळवून आणली होती, बावनकुळेंच्या सत्कार सोहळ्यात गडकरींची फटकेबाजी
बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाची संधी- गडकरी
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 4:40 PM

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. नागपुरात बावनकुळे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांचा जीवनपट ऑटोरिक्षा ड्रायव्हर (Autorickshaw Driver) असा होता. तिथून त्यांनी जीवनाची सुरवात केली. बाकीचं ते सांगत नाही त्यांनी बायकोपण त्यांनी पळवून आणली. असं म्हणताच, सत्कार कार्यक्रमात एकच हशा पिकला. तुम्हाला माहिती नसेल. त्यांची बायको कुणबी (Kunbi) समाजाची आहे आणि ते तेली (Teli ) समाजाचे आहेत. ते त्यांनी कसं केलं ते तुम्हाला एकट्यात सांगतीलं. पण, ते आता तरुण कार्यकर्त्याच्या उपयोगाचं सिक्रेट आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या भानगडीत पडू नये. त्याचे वडील, त्याचे भाऊ गरिबीची परिस्थिती होती. कोराडीच्या प्रकल्पात त्यांची जमीन गेली. त्यावेळी संघर्ष करून त्यांनी ती मिळविली. सुरुवातीला बावनकुळेंनी छत्रपती सेनेचं काम सुरू केलं. प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केलं.

अडकलेल्या योजना पूर्ण केल्या

नितीन गडकरी म्हणाले, भाजपची जिल्ह्यातील स्थिती चांगली नव्हती. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यानंतर कामठी मतदारसंघ मजबूत केलं. जिल्ह्यात भाजप भक्कम करण्याचं काम चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. खूप मेहनत घेतली. झोकून देऊन काम करणारे आणि बोटानं मलम लावणारे असे दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात. झोकून देऊन काम करणारा जिद्दीचा कार्यकर्ता म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे होय. त्यांनी प्रकृती, घराची चिंता केली नाही. माणसं जोडली. न्याय मिळवून दिला. जनतेचं प्रेम मिळविलं. देवेंद्र यांनी त्यांना ऊर्जा खात दिलं. त्या खात्यात त्यानी उत्तर काम केलं. प्रश्न सोडविले. विजेच्या पंपाचा बॅकलॉक संपविला. नागपूरच्या अडकलेल्या योजना त्यांनी पूर्ण केल्या.

हे सुद्धा वाचा

मी हे करेनच अशी जिद्द हवी

नितीन गडकरी म्हणाले, बावनकुळेंमध्ये एवढं कर्तुत्व आहे की, ते माणसाला बाई बनवतील आणि बाईला माणूस बनवतील. कोणती फाईल कशी फिरवतील. काही सांगता येत नाही. पण, लोकांचे प्रश्न ते मार्गी लावतात. प्रत्येक सिक्रेट मी सांगू शकत नसल्याचंही गडकरी म्हणाले. कोणाचा निधी होता. कोणत्या आमदाराचे पत्र होते. काम कुठं झालं काही पत्ता लागत नव्हता. पण, काम होत होते. कोणतंही काम करताना ओनरशीप हवी. ओनरशीप नसली तर ते काम होत नाही. मी हे करीन ही जिद्द बावनकुळेंच्या जवळ होती. त्यामुळं ऑटोरिक्षा चालक भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.