AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : अडीच वर्षात 5 वर्षांची कामं करायची आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं बावनकुळेंच्या सत्कार समारंभात मोठं वक्तव्य

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. सामान्य परिस्थितीतून त्यांनी स्वतःला मोठं केलं. जिल्हा परिषदेतून काम करून ते भाजपच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहचले आहेत.

Devendra Fadnavis : अडीच वर्षात 5 वर्षांची कामं करायची आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं बावनकुळेंच्या सत्कार समारंभात मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं बावनकुळेंच्या सत्कार समारंभात मोठं वक्तव्य
| Edited By: | Updated on: Aug 13, 2022 | 2:49 PM
Share

नागपूर : अडीच वर्षांत पाच वर्षांची कामं करायची आहेत. असं जबाबदारीचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष झालेत. त्याबद्दल त्यांचा नागपुरात जंगी सत्कार करण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात (Leadership) भाजपचा मोठा विस्तार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बावनकुळे यांनी ऊर्जा खात्याला न्याय दिला होता. आता प्रदेशाध्यक्ष (State President) पदाला ते न्याय देतील, असंही फडणवीस म्हणाले. नवीन सरकार राज्यात आलंय. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) हे मुख्यमंत्री आहेत. माझ्याकडं उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. वेळ कमी आहे. अडीच वर्षे निघून गेली आहेत. त्यामुळं अडीच वर्षात पाच वर्षांची धाव आपल्याला घ्यायची आहे.

या प्रदेशाध्यक्षांनी राज्यात भाजप वाढविली

महाराष्ट्राची विस्कळीत झालेली घडी रस्त्यावर आणायची आहे. राज्यात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचार याची मालिका सुरू झाली होती. ती मालिका थांबवून महाराष्ट्राला ट्रकवर आणून वेगानं तो धावला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमांच्या दुप्पट मदत देण्याचा प्रयत्न आपण केला. भाऊसाहेब फुंडकर, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, चंद्रकांतदादा पाटील आणि आता चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आहे. ना. स. फरांडे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांनी भाजप वाढविण्याचं काम ते प्रदेशाध्यक्ष असताना केलं आहे. वरील अध्यक्षांनी केलेल्या चांगल्या कामामुळं भाजप राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसतो आहे.

सामान्य कुटुंबातील व्यक्ती सर्वोच्च स्थानावर

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. सामान्य परिस्थितीतून त्यांनी स्वतःला मोठं केलं. जिल्हा परिषदेतून काम करून ते भाजपच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळं सामान्य कुटुंबातील व्यक्ती भाजपामध्ये सर्वोच्च स्थानापर्यंत जाऊ शकतो, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींच्या अनुभवाचा फायदा होईल

मी अमरावतीला जात असताना मला नड्डा साहेबांचा अचानक फोन आला. सांगितलं तुम्हाला पार्टी अध्यक्ष बनविलं जात आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी हा मोठा क्षण होता. पार्टीला सर्वोच्च स्तरापर्यंत पोहचविण्याची अपेक्षा व्यक्त केली. मी सगळ्या वरिष्ठ नेत्यांचं आभार मानतो. मी ही जबाबदारी गांभीर्य पाळून निभावेन. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या पदावर अनेक वर्षे काम केलं. देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असताना त्यांनी तर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता पलटवत भाजपची सत्ता आणली होती. त्यांच्या अनुभवाचा मला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.