अमरावतीत लॉकडाऊन वाढणार? कोरोना थांबेना, पाच दिवसात 32 जणांचा मृत्यू

अमरावतीत लॉकडाऊन काळात पाच दिवसात तब्बल 4 हजार 61 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमरावतीत लॉकडाऊन वाढणार? कोरोना थांबेना, पाच दिवसात 32 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 9:31 AM

अमरावती : विदर्भातली कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचं वाढणारं प्रमाण प्रशासनाची झोप उडवणारं आहे. अमरावती जिल्हात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप थांबण्याचं नाव घेत नाही. (Once Again Lockdown in Amravati? corona cases increasing)

अमरावतीत लॉकडाऊन काळात पाच दिवसात तब्बल 4 हजार 61 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर धक्कादायक म्हणजे 32 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तसंच अजूनही रुग्णांचं प्रमाण वाढतं आहे.

अमरावतीत लॉकडाऊन पुन्हा वाढणार?

अमरावतीत 22 फेब्रुवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषितलॉकडाऊन करण्यात आलं आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी होता. लॉकडाऊनची मुदत 1 मार्चला सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर पुकारला गेलेला पहिलाच लॉकडाऊन होता. मात्र आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतरही जिल्ह्यात कोरोनाबाधितांचं प्रमाण कमी झालेलं दिसत नाही. त्यामुळे अमरावतीत लॉकडाऊन वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.

12 कंटेन्मेंट झोन घोषित

अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला.

अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट ठरला आहे. अचलपूर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असून खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आली आहे.

(Once Again Lockdown in Amravati? corona cases increasing)

हे ही वाचा :

मोठी बातमी : अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.