Bhandara | भंडाऱ्यातील जळीत प्रकरणाला एक वर्ष पूर्ण; कसा झाला होता 11 बालकांचा होरपळून मृत्यू?

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नऊ जानेवारी 2021 च्या पहाटे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली. या आगीत 11 नवजात बालकांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता.

Bhandara | भंडाऱ्यातील जळीत प्रकरणाला एक वर्ष पूर्ण; कसा झाला होता 11 बालकांचा होरपळून मृत्यू?
आपबिती सांगताना महिला.

तेजस मोहतुरे

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अतिदक्षता विभागात आग लागून 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेला नऊ जानेवारी 2022 ला एक वर्ष पूर्ण झालाय. तरी सुद्धा दोषींवर ठोस कारवाई झाली नसल्याने पीडित मातांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे जळीतकांड प्रकरण?

भंडारा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या वॉर्डाला रात्री अचानक आग लागली. या आगीच्या वेळी परिचारिका बाजूच्या खोलीत झोपल्या होत्या. नवजात शिशू असल्यानं ते तिथून हलू शकत नव्हते. आगीत तसेच आगीच्या धुराने होरपळून बालकांचा मृत्यू झाला होता. भंडारा रुग्णालय जळीत प्रकरणात दोन नर्सेस कर्तव्यावर होत्या. पण, आउट बॉर्न आणि इन बॉर्न या ठिकाणी उपस्थित नव्हत्या. त्यामुळं या नर्सेसना आग लागल्याची माहिती लगेच मिळाली नाही. असे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्ट दिसत होते. त्यामुळं त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित महिला म्हणतात, दोषींवर अद्याप कारवाई नाही

घटनेनंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेटी दिल्या. दोषींवर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात मुख्यमंत्री यांनी समिती गठीत करत सात डॉक्टर व नर्सेसवर कारवाई करण्यात आली होती. तब्बल 39 दिवसांनंतर दोन कंत्राटी नर्सेसवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण जे दोषी डॉक्टर आहेत त्यांच्यावर का गुन्हा दाखल करण्यात आला नाही? कुठेतरी सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करून दोषी डॉक्टर यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पीडित माता योगिता धुळसे आणि दुर्गा रहांगडाले यांनी आता वर्षभरानंतर केला आहे.

रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा विषय चव्हाट्यावर

या घटनेनंतर रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा विषय चव्हाट्यावर आला होता. सध्या संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात दोन बाळांच्या मागे एक नर्स असायला पाहिजेत होत्या. मात्र या ठिकाणी 17 बाळांच्या मागे दोनच नर्स कर्तव्यावर होत्या. त्यामुळं या कंत्राटी नर्सेसवर अन्याय झाला असल्याचं बोलले जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संपूर्ण रुग्णालयात फायर सिस्टम व इलेक्ट्रिक नवीन केबल बसविण्याचा काम अंतिम टप्यात आहे. येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण यंत्रणा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पुण्यात ओमिक्रॉनच्या 28 रुग्णांची नोंद, महाराष्ट्राची संख्या 1247 वर

11 January 2022 Zodiac | आज या राशींच्या व्यक्तींनी खास काळजी घ्या ! संभाव्य धोका टाळा

नागपुरात सैन्यातील जवानाकडे सोन्याचं बिस्कीट सापडलं, धड उत्तर देईना, मग RPF जवानांनी…

Published On - 6:24 am, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI