AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Plastics Ban : नागपूर शहरात 1 जुलैपासून प्रतिबंधित प्लास्टिक बंदी, मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे जनजागृती

मनपाद्वारे करण्यात येणारी कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. साठवणूक केलेल्या प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिक वस्तू मनपाकडे सुपूर्द करण्याबाबत जनजागृती रॅलीद्वारे आवाहन करण्यात आले. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे.

Nagpur Plastics Ban : नागपूर शहरात 1 जुलैपासून प्रतिबंधित प्लास्टिक बंदी, मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे जनजागृती
75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 28, 2022 | 6:29 PM
Share

नागपूर : केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत अधिसूचना जारी केलीय. नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे आज शहरात जनजागृती करण्यात आली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Radhakrishnan) यांच्या निर्देशानुसार दहाही झोनमधील पथकांनी रॅली काढण्यात आली. बाजारपेठांमध्ये फिरून नागरिकांना, व्यापारी बांधवांना, दुकानदारांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले. केंद्रीय पर्यावरण (Environment), वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मितीवर प्रतिबंध लावण्यात आलाय. आयात, साठवणूक, वितरण (Distribution), विक्री आणि वापर हे 1 जुलैपासून पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर शहरामध्ये 1 जुलैपासून उपद्रव शोध पथकाद्वारे धडक कारवाई केली जाणार आहे.

75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी

मनपाद्वारे करण्यात येणारी कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. साठवणूक केलेल्या प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिक वस्तू मनपाकडे सुपूर्द करण्याबाबत जनजागृती रॅलीद्वारे आवाहन करण्यात आले. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे, प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणा-या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी – जसे काटे चम्मच, चाकू, स्ट्रॉ, ट्रे. 100 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणा-या पिशव्या वगळण्यात आलंय. सर्व कम्पोस्टेबल प्लास्टिक, पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाउल, कंटेनर (डबे) आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे. प्रतिबंधित सर्व प्रकारच्या प्लास्टिकचा वापर हा पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत घातक आहे.

1 जुलैपूर्वी मनपाला माहिती द्यावी

प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात येत्या 1 जुलैपासून नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत बाजारपेठ, दुकाने, आस्थापनांमध्ये तपासणीची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. या कारवाईमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक साहित्याचा वापर, वाहतूक व साठवणूक आढळल्यास कारवाई होणाराय. महाराष्ट्र विघटनशील कचरा नियंत्रण कायदा 2006 अंतर्गत महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 चे उल्लंघन केल्या प्रकरणी नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. नागपूर शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा, आस्थापना, व्यापारी संघटना आदींनी आपल्याकडे उपरोक्त प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा असल्यास त्याबद्दल 1 जुलैपूर्वी मनपाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...