AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन तेंडुलकर यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी दंड थोपटले, थेट घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलनाचा इशारा; कारण काय?

आम्ही सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करू शकतो. भारतीयांची ऑनलाईन गेमपासून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही त्यांना नारळपाणी देऊ. नारळ देऊ.

सचिन तेंडुलकर यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी दंड थोपटले, थेट घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलनाचा इशारा; कारण काय?
bacchu kadu Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 11, 2023 | 9:50 AM
Share

नागपूर | 11 ऑगस्ट 2023 : मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याविरोधात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दंड थोपाटले आहेत. सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. थेट सचिन यांच्या घरासमोरच प्रहार स्टाईलने आंदोलन केलं जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. तसेच सचिन यांनी या जाहिरातीतून माघार घ्यावी म्हणून बच्चू कडू यांनी सचिन यांना 15 दिवसाचा अल्टिमेटमही दिला आहे.

बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमबाबतचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ते भारतरत्न आहेत आणि भारताचे अभिमान आहेत. त्यांनी या ऑनलाईन गेममध्ये चुकूनही त्यांचा फोटो असलेले कुठे पोस्टर वगैरे आहे की नाही हे तपासलं पाहिजे. तसेच त्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ही आमची विनंती आहे. ते नाही झालं तर आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

नारळपान आंदोलन

आम्ही सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करू शकतो. भारतीयांची ऑनलाईन गेमपासून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही त्यांना नारळपान देऊ. नारळ देऊ. त्यांना नारळ देऊन त्यातून बाहेर निघण्याची विनंती करू. आमचं आंदोलन नेहमी अनोखं असतं. यावेळीही तसेच असेल. आम्ही सचिन तेंडुलकर यांना नारळपान देण्याचं आंदोलन करणार आहोत. लोकं सुपारी घेतात, तुम्ही नारळ घ्या. जाहिरातच नाही तर ऑनलाईन गेमच हद्दपार करा, अशी विनंती सचिन यांना करू, असं बच्चू कडू म्हणाले.

गेमच बंद करा ना

ऑनलाईन गेमचा दुष्परिणाम तरुण पिढीवर होत आहे. चारपाच मुलं एकत्र येऊन हा गेम खेळत आहेत. पालकांमध्ये चिंता आणि रोष आहे. गेममध्ये अधिक पैसे गुंतवू नका, तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, अशी चेतावणी दिली जाते खरी. पण चेतवणी द्यायचीच कशाला? हा गेमच बंद करा ना. बऱ्याच राज्यांनी ऑनलाईन गेम बंद केला आहे. आपल्या राज्यातही तो बंद झाला पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

15 दिवसांची मुदत देणार

राज्यात ऑनलाईन गेम बंद व्हावा म्हणून आम्ही सचिन यांच्या जाहिरातीला विरोध करत आहोत. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत. त्यामुळेच आमचा त्यांनी जाहिरात करण्यावर विरोध आहे. ते भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. सचिन यांनी जाहिरातीतून माघार घेण्यासाठी आम्ही त्यांना 15 दिवसांची मुदत देऊ आणि त्यानंतर आम्ही आंदोलन करणार आहोत, असंही ते म्हणाले.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..

ही तर सियापेक्षा भयानक.., घरात पतीचा मृतदेह, जखमी मुलगा जमिनीवर;  बेडवर झोपून पत्नी मात्र...

ही तर सियापेक्षा भयानक.., घरात पतीचा मृतदेह, जखमी मुलगा जमिनीवर; बेडवर झोपून पत्नी मात्र..

आताची सर्वात मोठी बातमी, सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नाराज? अचानक नेमकं काय घडलं?.

आताची सर्वात मोठी बातमी, सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नाराज? अचानक नेमकं काय घडलं?

भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफसह निर्बंध...

भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफसह निर्बंध..

40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा.

40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral.

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral