AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालकमंत्रीपदाचा तिढा वाढला, राष्ट्रवादीचा चार महत्त्वाच्या पालकमंत्रीपदावर दावा; शिंदे गट, भाजपची डोकेदुखी वाढली

रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आग्रही आहेत. गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. मात्र, त्यांचा मंत्रिमंडळात लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे.

पालकमंत्रीपदाचा तिढा वाढला, राष्ट्रवादीचा चार महत्त्वाच्या पालकमंत्रीपदावर दावा; शिंदे गट, भाजपची डोकेदुखी वाढली
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 11, 2023 | 9:01 AM
Share

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : शिंदे-भाजप सरकारमध्ये अजित पवार यांच्या गटाचा समावेश झाल्यापासून या दोन्ही पक्षांची चांगलीच कोंडी झाली आहे. अजितदादा गटाच्या एन्ट्रीमुळे शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांची मंत्रिपदे घटली. अजितदादा यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागलं. अजितदादा गटाला महत्त्वाची मंत्रिपदे द्यावी लागली. आता अजितदादा गटाने पालकमंत्रीपदांवर दावा केला आहे. मात्र, महत्त्वाच्या जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावर दावा केला आहे. विशेष म्हणजे शिंदे गट आणि भाजपने आधीच या पालकमंत्रीपदांवर दावा केला आहे. त्यामुळे तिढा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालकमंत्रीपदासाठी महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही आहे. तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे. असं असतानाच आता अजितदादा गटाकडून पुणे, नाशिक, रायगड आणि कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे.

रेड कार्पेट की…

राष्ट्रवादीने चार पालकमंत्रीपदांवर दावा केला आहे. त्यातील दोन पालकमंत्रीपदांवर आधीच भाजप आणि शिंदे गटाने दावा केलेला आहे. त्यामुळे महायुतीत पालकमंत्रीपदासाठीची रस्सीखेच वाढली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पुण्यात राष्ट्रवादीचा मोठा बेस आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीला पुण्याचं पालकमंत्रीपद हवं आहे. मात्र, अजितदादांना रेड कार्पेट टाकणारी भाजपा आता पुण्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला सोडणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

रायगडवर स्वारी कुणाची?

रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आग्रही आहेत. गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. मात्र, त्यांचा मंत्रिमंडळात लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे. मंत्री झाल्यावर रायगडचं पालकमंत्रीपद माझ्याकडेच घेणार असल्याचं गोगावले यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनाही रायगडचं पालकमंत्रीपद हवं आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद कुणालाही देण्यात आलेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तात्पुरते वाटप

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपदाचं तात्पुरतं वाटप करता आलं आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी हे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. ज्या जिल्ह्यात पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही, तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य दिनी कोण कुठे ध्वजारोहण करणार

◾देवेंद्र फडणवीस – नागपूर ◾ अजित पवार – कोल्हापूर ◾ छगन भुजबळ – अमरावती ◾ सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर ◾ चंद्रकांत पाटील – पुणे ◾ दिलीप वळसे पाटील – वाशिम ◾ राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर ◾ गिरीश महाजन – नाशिक ◾ दादा भुसे – धुळे ◾ गुलाबराव पाटील – जळगाव ◾ रविंद्र चव्हाण – ठाणे ◾ हसन मुश्रीफ – सोलापूर ◾ दीपक केसरकर – सिंधुदुर्ग ◾ उदय सामंत – रत्नागिरी ◾ अतुल सावे – परभणी ◾ संदीपान भुमरे – औरंगाबाद ◾ सुरेश खाडे – सांगली ◾ विजयकुमार गावित – नंदुरबार ◾ तानाजी सावंत – उस्मानाबाद ◾ शंभूराज देसाई – सातारा ◾ अब्दुल सत्तार – जालना ◾ संजय राठोड – यवतमाळ ◾ धनंजय मुंडे – बीड ◾ धर्मराव आत्राम – गडचिरोली ◾ मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर ◾ संजय बनसोडे – लातूर ◾ अनिल पाटील – बुलढाणा ◾ आदिती तटकरे – पालघर

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.