शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचत नाहीत, युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे : देवेंद्र फडणवीस

नोकरी मागायला सगळे येतात मात्र स्वयं रोजगार करण्याकडे कोणी वळत नाही. युवकांनी आता स्वयंरोजगाराकडे वळावे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचत नाहीत, युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

नागपूर : नोकरी मागायला सगळे येतात मात्र स्वयंरोजगार करण्याकडे कोणी वळत नाही. युवकांनी आता स्वयंरोजगाराकडे वळावे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान रोजगार सर्जन कार्यक्रमासंदर्भात नागपुरात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. (schemes do not reach to last man youngsters have to think about self employment said Devendra fadnavis)

ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूरला व्हावं ही अपेक्षा

खादी व ग्रामोद्योग आयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रासंदर्भात गरजू तरुणांना माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना “या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल्स लागले आहेत. त्यावरून दिसून येतं की रोजगार कसे निर्माण होतात. या उद्योगांना बळ ध्यायचं महत्वाचं काम आहे. कोरोनानंतर या उद्योगांना मदत केली तर ते चांगले होऊ शकतात. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूरला व्हावं ही अपेक्षा आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे फडणवीस म्हणाले.

योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाहीत

तसेच पुढे बोलताना हा कार्यक्रम सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी सगळे प्रतिनिधी काम करतील. खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यातून रोजगार निर्मिती होईल. योजना सुलभ करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काम केलं. योजना अनेक तयार होतात पण त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाहीत, अशी खंतही फडणवीस यांनी बोलवून दाखवली.

इतर बातम्या :

सेल्फी काढताना दादा पाण्यात पडला, धाकट्याचीही धरणात उडी, दोन सख्खे भाऊ बुडाले

राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील सेना संपणार नाही, विनायक राऊतांचा हल्ला; आता निलेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर

आदिवासी समाजाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबध्द, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची ग्वाही

(schemes do not reach to last man youngsters have to think about self employment said Devendra fadnavis)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI